लोकसभेला `त्यांना' मदत नाही; आमदार सतेज पाटील यांचा सूचक इशारा 

२०१४ च्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्यांना गट - तट मतभेद विसरून खासदार केलं त्यांनी आमची फसवणूक केली आहे. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मदत करायची नाही, हा आम्ही ठाम निश्चय केला असल्याचे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले.
लोकसभेला `त्यांना' मदत नाही; आमदार सतेज पाटील यांचा सूचक इशारा 

कोल्हापूर : २०१४ च्या  निवडणुकीमध्ये आम्ही ज्यांना गट - तट मतभेद विसरून खासदार केलं त्यांनी आमची फसवणूक केली आहे. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मदत करायची नाही, हा आम्ही ठाम निश्चय केला असल्याचे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले. 

मोरेवाडी येथे विविध विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांचे नाव न घेता हे वक्तव्य केले असले तरी यामुळे पाटील यांनी आपली भूमिका या निमित्ताने स्पष्ट केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत खा धनंजय महाडीक विरोधात पाटील संघर्ष अटळ बनला आहे.

दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी येथे विविध विकास कामाच्या शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आला आहे. मोरेवाडी ग्रामपंचायती वतीने गावातील रस्ते, गटार, पाण्याची टाकी अंतर्गत कॉक्रीटीकरण रस्ते याचा उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, की जुने सर्व मतभेद विसरून गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना मदत केली. प्रसंगी कार्यकर्त्यांना शपथ घातली. पण अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे पी. एन. पाटील व माझ्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना मदत करायची नाही ही आपली भूमिका असून आपण त्यावर ठाम आहे.

कॉग्रेस सरकार सत्तेवर असताना विकासाला प्राधान्य दिले. परंतु खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. आता पुन्हा एकदा विकासाची गंगा गावोगावी पोचवण्यासाठी आगामी निवडणुकीत काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा वास्कर, मोरेवाडीच्या सरपंच सुनंदा कुंभार, उपसरपंच शिवाजी देसाई, वैशाली भोसले ,रुपाली भोसले यांसह मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com