तब्बल 22 वर्षानंतर महाडिक घराण्यात आमदार पद नाही 

विधान परिषदेला महादेवराव महाडिक यांच्या पराभवापाठोपाठ विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक यांच्या पराभवामुळे तब्बल 22 वर्षानंतर येथील आमदारकीची पाटी कोरी झाली आहे. शिरोलीचा समावेश हातकणंगले (पूर्वीचा वडगाव) विधानसभा मतदार संघात आहे. मतदार संघ राखीव असल्यामुळे तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे आमदारकीच्या मांडवाखालून जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
Amal Mahadik - Mahadeorao Mahadik
Amal Mahadik - Mahadeorao Mahadik

शिरोली पुलाची  : विधान परिषदेला महादेवराव महाडिक यांच्या पराभवापाठोपाठ विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक यांच्या पराभवामुळे तब्बल 22 वर्षानंतर येथील आमदारकीची पाटी कोरी झाली आहे. शिरोलीचा समावेश हातकणंगले (पूर्वीचा वडगाव) विधानसभा मतदार संघात आहे. मतदार संघ राखीव असल्यामुळे तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे आमदारकीच्या मांडवाखालून जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. 

कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व करणाऱ्या महादेवराव महाडिक यांनाही आमदारकीची स्वप्न पडू लागली. (कै.) दिग्वीजय खानविलकरांच्या विराधात महाडिक यांनी विधानसभेची निवडणूक लढवली ; मात्र जनतेने महाडिकांच्या विरोधात कौल दिला. पराभवानंतर शांत बसतील ते महाडिक कसले. पराभवानंतर त्यांनी विधान परिषदेची तयारी सुरु केली. कोल्हापूर विधान परिषद मतदार संघातून 1997 ला ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर ते दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. असे महाडिक हे अठरा वर्षे आमदार होते. ते काँग्रेसचे आमदार होते ; मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यानी पुतणे धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतून खासदार केले, तर विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून चिरंजीव अमल महाडिक यांना भाजपमधून आमदार केले. 

अमल महाडिक यांनी तर काँग्रेसचेच नेते व तात्कालीन मंत्री सतेज पाटील यांचा पराभव केला होता. 2014 ला शिरोलीत महाडिकांच्या घरात दोन आमदार होते. ही बाब शिरोलीकरांसाठी अभिमानाची बाब होती ; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. 2015 च्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी महादेवराव महाडिक यांना मिळाली नाही. यामुळे महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना भाजपने पाठिंबा दिला. तर काँग्रेसने माजी मंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांनी महाडिकांचा पराभव केला. त्यामुळे शिरोलीतील एक आमदार कमी झाला. तरीही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचा पत्ता शिरोली असल्याचे समाधान होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक व काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात 'हाय व्होल्टेज' लढत झाली. यामध्ये ऋतुराज पाटील यांनी विजयश्री खेचून आणत, काका सतेज पाटील यांच्या पराभवाचे उट्टे काढले. त्यामुळे तब्बल 22 वर्षानंतर शिरोलीत आमदारांची पाटी जाऊन, माजी आमदार अशी पाटी लागणार आहे.

महादेवराव महाडिक काँग्रेसचे, पुतणे धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे माजी खासदार, एक चिरंजीव अमल भाजपमध्ये तर दुसरे चिरंजीव स्वरूप ताराराणी आघाडीचे अध्यक्ष. अशा सोयीच्या राजकारणामुळेच विधान परिषद, लोकसभा व विधानसभेत महाडिकांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com