तुमचे डॉन अमित शहांना कोल्हापूरात फिरू द्यायचे असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या आधी मान्य करा : शेट्टी 

.
shetty-shaha
shetty-shaha

कोल्हापूर :  " साखर कारखानदारांकडून कमी दरात वीज खरेदी करतात तिच वीज शेतकऱ्यांना महाग दरात विकतात त्याचा हिशेब करण्याचे नाकारतात, शेतकऱ्याला एफआरपी देत नाहीत, त्यामुळे तुमचे डॉन अमित शहांना कोल्हापूरात फिरू द्यायचे असेल तर शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा.'' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात दिला. 

कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डात शेतकरी मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या वीज बिलावरील पोकळ थकबाकी रद्द करावी तसेच वाढीव वीज दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी येत्या 21 जानेवारीला शिरोली पुलाजवळ महामार्ग रोको करण्यात येणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने सहभागी होईल.

असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले की, "शेतकऱ्यांनी केवळ हजार पाचशे संख्येने या आंदोलनात उपस्थित न रहाता हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे तरच सरकार दखल घेणार आहे. अन्यथा यांच्या आंदोलनात दम नव्हता असे सरकार म्हणू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांचे गांभिर्य सरकारला समजण्यासाठी आंदोलन तीव्रच करावे लागेल.'' 

शेतकऱ्यांच्या डोईवर वीज वितरण कंपनीने वीज दरवाढ लादली आहे असा आरोप करीत श्री. शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला ते म्हणाले की, "वीज दरात वारंवार वाढ केली, विज बिलात तांत्रिक घोळ करून शेतकऱ्यांची लुट केली आहे. त्यासाठी सत्यशोधन समिती नियुक्त केली होती त्या समितीच्या शिफारशी वीज कंपनी मान्य करीत नाही. याउलट साखर कारखान्यांकडून कमी दराने वीज घेऊन तीच महागात दरात विकली जाते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे, खतावर जीएसटी लावला आहे. उत्पादन घटत होत आहे, शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्याजोडील वीज दरवाढीचे संकट शेतकऱ्यावर आहे. त्या विरोधात शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय गत्यंतर नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com