क्षीरसागरांच्या सुरक्षारक्षकाची सर्विस रिव्हॉल्वर लंपास?

हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली असून लक्ष्मीपुरी पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
क्षीरसागरांच्या सुरक्षारक्षकाची सर्विस रिव्हॉल्वर लंपास?

कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल अनिकेत मोरे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत चार तोळे दागिने, सहा तीस हजारांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी मोरे यांची सर्विस रिव्हॉल्वर ही पळवल्याची चर्चा सुरू आहे. गंगावेश परिसरातील धोत्रे गल्ली येथे घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला. 

अनिकेत मोरे हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्यांची सध्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. गंगावेश परिसरातील धोत्रे गल्ली येथे भाड्याने राहणाऱ्या मोरे यांची पत्नी धनश्री या मंगळवारी सांगली येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. तर मोरे हे आपल्या बहिणीकडे राहिले होते. गुरुवारी सायंकाळी उशिरा त्या परत आल्या. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल. पती अनिकेत यांनी दार उघडे ठेवले असावे म्हणून त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. आज घरातील चार तोळे दागिने सह तीस हजारांची रोकड लंपास झाल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे मोरे यांची सर्विस रिव्हॉल्वर व जिवंत काढतुसे ही चोरल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com