udayanraje
udayanraje

सातारा : उदयनराजेंनी  आनेवाडी टोलनाका बंद पाडला

सातारा   :  महामार्गावरील आनेवाडी टोलनाका व्यवस्थान आज बदलणार असल्याने व स्थानिक कामगारांना बदलणार असल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांस टोल नाक्यावर गेले. त्यांनी टोल वसुली बंद केली. तसेच टोल व्यवस्थापनाच्या कार्यालयात ठिय्या मारला.

त्यामुळे सायंकाळीसहा ते साडेसात सुमारे दीड तास येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आनेवाडी टोलनाका यापूर्वी खासदार उदयनराजे समर्थक अशोक सावंत यांच्याकडे चालविण्यास होता. पण नुकतेच रिलायन्स कंपनीने येथील व्यवस्थापन बदलले. आत्ता हा टोल नाका साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्याकडे आले आहे. 

नवीन व्यवस्थापन येथील स्थानिक कामगारांना काढून टाकेल या आशंकेने  कामगारांनी उदयनराजे भोसले याना निवेदन दिले होते. त्यानंतर खासदारांनी टोल नाक्यावर येऊन कामगारांची बाजू घेत रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. त्यानंतर स्थानिक कामगारांना कामावरून काढले जाणार नाही असे नवीन व्यवस्थापणाने पत्रक काढून स्पष्ट केले होते.

यानंतर आज या टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलणार अशी माहिती उदयनराजेना समजले. त्यामूळे ते आपल्या समर्थकांसह टोलनाक्यावर गेले. त्यांनी तेथील कार्यालयात ठिय्या मारला. तसेच टोल वसुली बंद केली. 
त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दीड  तास थांबल्यानंतर उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांसह परत साताऱ्याकडे रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com