आम्ही फक्त म्हणण्यापुरते सत्तेत : उद्धव ठाकरे

"मी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर संपर्कदौरे करून लोकांशी संवाद साधत आहे. निवेदनाचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे लोक मला निवेदने देत आहेत. मुख्यमंत्र्याना निवेदने द्यायची सोडून लोक मला निवेदने देत आहेत. याचे कारण एकच आहे, आपण म्हणायला सतेत आहोत. पण सत्ताधाऱ्यापेक्षा लोकांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे, हे मी माझे भाग्य समजतो." असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
आम्ही फक्त म्हणण्यापुरते सत्तेत : उद्धव ठाकरे

विटा : "मी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर संपर्कदौरे करून लोकांशी संवाद साधत आहे. निवेदनाचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे लोक मला निवेदने देत आहेत. मुख्यमंत्र्याना निवेदने द्यायची सोडून लोक मला निवेदने देत आहेत. याचे कारण एकच आहे, आपण म्हणायला सतेत आहोत. पण सत्ताधाऱ्यापेक्षा लोकांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे, हे मी माझे भाग्य समजतो." असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.  

कार्वे (ता. खानापूर) येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार अनिलराव बाबर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे - पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पाटील, बजरंग पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, विटा नगरपालिकेचे नगरसेवक अमोल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, "पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरने चांगले आमदार दिले. कोल्हापूरकरांचे उपकार आहेतच. पण सांगलीने काही दिले नाही. सांगलीला कशाला जायचे ? पण सांगलीकर हे माझे भावंडे आहेत.  माता - भगिनी आहेत. त्यांच्या सेवेसाठी त्यांना जेव्हा गरज लागेल त्यांनी हाक मारो न मारो मी येणारच. मी येणारच आणि माझे कर्तव्य करणार."

सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "राज्यात सत्ता बदलूनही काहीही फरक पडलेला नाही. दोन महिन्यापूर्वी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्यासाठी सौभाग्य योजना आणली. काय झाले त्याचे? आज ही ग्रामीण भागात विजेच्या कनेक्शनसाठी शेतकरी उंबरठे झिजवतोय. मागेल त्याला वीज कनेक्शन मिळत नाही. सरकारने स्वत: च्या स्वार्थासाठी शिवरायांचे नाव वापरले. छत्रपती शेतकरी सन्मान योजना आणली जून महिन्यात सांगितले होते की कर्जमाफी देऊ. गणपती गेले , दसरा गेला, दिवाळी गेली, आता काय नवे वर्ष सुरु होईल. कधी देणार आहात कर्जमाफी ?"   

ते पुढे म्हणाले, "एकीकडे मुख्यमंत्री सांगतात साडेदहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले आहेत. मग ते दिसत का नाहीत ? अरे मग एकसुद्धा शेतकरी नाही या गावामधला साडेसहा हजार मधला? पाच ते सहा शेतकऱ्यांना केवळ ते मिळाले असतील तेही अजून त्यांच्या खात्यावर आले नसतील. तुम्ही सांगता 34 हजार कोटींची कर्जमाफी केली. 40 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचे, 89 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला, असे सांगत आहात तर मग गेले कुठे सगळे ? काय झालंय प्रत्यक्षात ? नुसते आकड्यांचे खेळ सुरु आहेत. 34  हजार कोटीपर्यंत कर्जमाफी जाईल. कर्जे असतील तर ती 20 हजार कोटींच्या आसपास असतील. वरचे 14 हजार कोटी जे जाहीर केलेत, त्याचे मुख्यमंत्री महोदय काय केलेत? कर्जमाफीच्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा सुरु आहे की काय अशी भीती वाटायला लागली आहे. नुसत्या घोषणा करून आपल्याला बधीर करून टाकायचे काम सुरु आहे. कसले राज्य? परिस्थिती बदलायची असेल तर इथे जसा भगवा दिसतोय तसा संपूर्ण सांगली जिल्हा भगवा करून दाखवा."

सांगली जिल्हा दुष्काळी विभागात येतो. दुष्काळ केवळ तूमच्यापुरता मर्यादित  नाही. राजकीयदृष्ट्या आमच्यासाठीसुद्धा हा जिल्हा दुष्काळी आहे. आम्हीसुद्धा मेहनत करतो. कित्येक वर्षांने आमदार अनिलराव बाबर यांच्या रूपाने फळ लागले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाबरोबरच बाकीचा राहिलेला सांगली जिल्हा भगवा करायचा आहे. भगव्या झेंड्याची फळ फुलवायची आहेत. त्यासाठी शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

फूलटॉस टाकून टेंभू योजना पूर्ण करा
टेंभू योजनेचे किती टप्पे करायचे. एक टप्पा, दोन टप्पा, तीन टप्पा, पाच टप्पा हे टप्पे - टप्पे एकदाशी बंद करून एकदाच फूलटॉस टाकून टेंभू योजना पूर्ण करून टाका. पिढ्यानपिढ्या जातात पण प्रकल्प तसाच पडून राहतो. पण त्याची लाज, लज्जा, शरम कुणाला वाटत नाही, अशा तीव्र शब्दात ठाकरे यांनी सरकारवर आसूड उगारला.

निवेदनाचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ
सरकारवर टीकेचे बाण सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर संपर्कदौरे करून लोकांशी संवाद साधत आहे. निवेदनाचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे लोक मला निवेदने देत आहेत. मुख्यमंत्र्याना निवेदने द्यायची सोडून लोक मला निवेदने देत आहेत. याचे कारण एकच आहे, आपण म्हणायला सतेत आहोत. पण सत्ताधाऱ्यापेक्षा लोकांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची सर्व गाऱ्हाणी घेऊन मी मुख्यमंत्र्याना भेटणार आहे. विधानसभेत आणि लोकसभेत यावर शिवसेना आवाज उठवणार आहे. लोकशाही पद्धतीने प्रश्न सुटले नाहीत तर रस्त्यावरची लढाई लढणार आहे. माझ्या दौऱ्याना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जर सगळंच चांगलं चाललं असत तर एवढा प्रतिसाद मिळाला नसता."

उद्धव ठाकरे म्हणाले :

@ सांगली जिल्हा भगवामय करण्यासाठी शिवसेनेला साथ द्या

@ मुख्यमंत्री अपयशी म्हणून आमच्या संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

@ जनता नव्हे तर सरकारच खरे लाभार्थी

@ व्हय मी लाभार्थी म्हणून मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील यांचा फोटो लावा

@ अच्छे दिन येतील म्हणून पाठिंबा दिला पण 3 वर्षात महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला

@ वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शरद पवारांनी आम्ही कसे वागावे ? आम्हाला शिकवू नये

@ जनतेची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यापर्यंत मांडणार ; प्रश्न न सुटल्यास रस्त्यावरची लढाई करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com