

एका वाघिणीने प्रथम बैलाची शिकार केली, त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि अवघ्या एका तासाच्या अंतराने ती वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवारातील आहे.
पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. “मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.” असे स्पष्टीकरण स्पष्ट शिंदे यांनी दिलं आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथे चार चाकी वाहन आणि दुचाकी वाहन समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोघा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर या अपघातामध्ये चार जण गंभीररित्या जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नवीन डीपी लाईनवर सुरक्षिततेसाठीचे गार्डिंग काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका १९ वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. जुम्मन मोहमद नसीम असे या मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी होता. बोरगाव येथील सरकारी दवाखान्याजवळ नवीन बसवण्यात आलेल्या डीपी लाईनचे काम रविवारी दुपारी सुरू होते. त्यासाठी जुम्मन हा डीपीवर चढला, मात्र लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने विजेचा जोरदार धक्का बसून तो जागेवरचं मृत पावलं आहे.
अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्याधीश भूषण गवई यांच्यावर धीरेंद्र शास्त्री यांना भेटल्याबद्दल टीका केली होती. त्यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊ नये, असेही मानव यांनी म्हटले होते. त्यांना भूषण गवई यांचे भाऊ राजेंद्र गवई यांनी उत्तर देत आव्हान दिले आहे. प्रत्येक आंबेडकरी नेता हा मंदिर, मशिदीत गेला आहे. समाजात राहत असताना मित्रांच्या आग्रहाखातर जावं लागतं. श्याम मानव यांनी भूषण गवईंना नंतर रोखावं. तुमच्यात हिम्मत असेल तर पहिलं मला रोखून दाखवा. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी निशस्त्र येईन, असे चॅलेंज राजेंद्र गवईंनी श्याम मानव यांना दिले आहे.
अशोक खरात याला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ज्या ज्या विभागाचे अधिकारी यात सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे धीरेंद्र शास्त्री यांनी माफीनामा सादर केला आहे. शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही स्वप्नातसुद्धा सहन करणार नाही. शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही फक्त गुरु महिमा गायला होता. संतांना देशातील राजा किती मानत होते, हे आमचा सांगण्याचा प्रयत्न होता. आमचे चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यात आले. आमच्या त्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो, अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांना आपणच मोठं केलं आहे. त्यांनी देवावर बोलावं. त्यांनी इतिहासात डोकावण्याचे काय कारण आहे. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली का, यावरच लोकांचा आक्षेप आहे. त्यामुळे अशा लोकांचा निषेध केला पाहिजे, मी सुद्धा त्यांचा निषेध करतो, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
राज्यासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आलेली असताना पुणेही चांगलेच तापले आहे. आज पुणे शहरात तब्बल ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
युवा सेनेचे विकास गोगावले यांनी रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे, त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा धूसफूस सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. भविष्यात काय होतं, हे बघू. पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, त्याच्याशी मी सहमत असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सर्वांत उष्ण १५ शहरांमध्ये राज्यातील तीन शहरांचा समावेश आहे. ही महाराष्ट्रासाठी चिंतेची गोष्ट आहे. या तीन शहरांमध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा यांचा समावेश होतो. अकोला आणि अमरावतीमध्ये ४५.३, तर वर्ध्यात ४५.५ तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांत उष्माघातामुळे दोन जणांचे बळी गेले आहेत.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान अजूनही अन्य आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या कॉल डिटेल्समधून हे स्पष्ट झाले आहे. येत्या २७ एप्रिल रोजी तिच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लोकार्पण १ मे रोजी होणार असून हा रस्त्यावरून प्रवासासाठी वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या लिंकमुळे इंधन आणि वेळेची बचत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई-पुणे मिसिंग लिंकची पाहणी करण्यात आली. ता. ए मे रोजी या मिसिंग लिंकचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे.
धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच अभिनेता रितेश देशमुखने या वादाता उडी घेतली आहे. त्याने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील, असे रितेशने म्हटले आहे.
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झालाय. यात 5 प्रवासी जखमी झालेय. ही घटना कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक 167 वर घडलीये. जखमींवर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
राज्यातील राजकीय नेतृत्वावर भाष्य करत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, क्षमता असूनही अजित पवार आणि पंतगराव कदम हे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. महाराष्ट्राने हे दोन्ही मुख्यमंत्री गमावले.
भोंदू मनोहर भोसले याचे कर्माळा तालुक्यातील घोटी गावातील आश्रम बंद करण्याची मागमी गावकऱ्यांनी केली आहे. तसे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना लिहण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे आश्रम सुरु होतं. २७ एकरावर असलेल्या या आश्रमात दर आमावस्येला दरबार भरत होता.
मुंबई-पुणे प्रवासासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ मेपासून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. Mumbai ते Pune दरम्यानच्या प्रवासात वेळ वाचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
PMPML बस चोरी प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपालसिंग बलबिरसिंग राणा असं संशियत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती लागले आहेत. कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर CA ललित पोफळेकडून लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात लग्न समारंभात डीजे वर नाचताना लागलेल्या धक्का लागला आणि त्यातून झालेल्या वादातून एका युवाकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'वॉशिंग्टन डीसी मधील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, प्रथम महिला आणि उपराष्ट्रपती सुरक्षित आणि सुखरूप आहात, हे समजल्यानंतर समाधान वाटलं. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही आणि तिचा निःसंदिग्धपणे निषेधच केलाच पाहिजे.', अशा शब्दात मोदींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत कोणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात स्थळी अघोरी पूजा करतंय का? असा सवाल उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी फोटो शेअर करत लिहिलं की, 'काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सोलापूर महापालिका रुग्णालयात आणखी चार बालमाता आढळल्या आहेत. अल्पवयीन माता असल्याचे समजतात डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. सोलापुरात बालमाता प्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लागताच सरकारी आणि खाजगी डॉक्टर अलर्ट मोडवर आले आहेत. गुरूवारी आणि शुक्रवारी मनपाच्या रुग्णालयात या बालमाता आढळल्या आहेत. बालमाता प्रकरणी माहिती लपवल्याप्रकरणी खासगी आणि सरकारी डॉक्टरांवर गुन्हे दाखल होत आहेत. महापालिकेकडून 130 प्रसूतीगृहातील प्रत्येक प्रसूती महिलेची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे.
सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांची सुषमा अंधारे हटावची मागणी केली आहे. दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची गद्दार अजय दासरींची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. सोलापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.
राजस्थानमधील बहुचर्चित भाजप नेते जयपाल पुनिया हत्याकांडमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. एडिजे न्यायालयने चार वर्ष जुन्या खटल्याचा निकाल देत माजी मुख्य आरोपी मोती सिंग, आमदार महेंद्र चौधरी याच्यासह नऊ दोषीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते जयपाल पुनिया यांची 14 मे 2022 रोजी निर्घृणपणे हत्या केली होती. बोलेरो गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हत्येमुळे राजस्थानमध्ये मोठा हादरा बसला होता.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात रात्री युवकाच्या खुनाची धक्कादायक घटना घडली. डिजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादातून थेट खून झाला. यामध्ये चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान (वय 23, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) असे मृतक युवकाचे नाव आहे.
देशाचा कणा असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था सध्या ‘दुभंगलेल्या आभाळा’सारखी झाली आहे. मागील 20 वर्षांतील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना शेतकरी करत आहेत. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादकांना एकरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या गटाने एच-1बी व्हिसा कार्यक्रमावर तीन वर्षांची स्थगिती आणण्याचा प्रस्ताव ठेवत नवे विधेयक काँग्रेसमध्ये सादर केले आहे. ‘एन्ड एच-1बी व्हीसा अब्युज अॅक्ट ऑफ 2026’ या नावाने सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे अमेरिकेत काम करणार्या परदेशी व्यावसायिकांवर, विशेषतः भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अरिझोनाचे खासदार एली क्रेन यांनी हे विधेयक मांडले असून सात इतर रिपब्लिकन खासदारांनी त्याला सहप्रायोजकत्व दिले आहे.
महाराष्ट्रात कपाशीच्या एचटीबीटी वाणावर प्रतिबंध असतानाही खरीप हंगामाच्या तोंडावर ही प्रतिबंधित कपाशीची बियाणे तस्करी वाढली आहे. मात्र या प्रतिबंधित बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केली असून, काल अमरावतीमध्ये आठ लाख रुपये किमतीचे बियाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आयएमएमध्ये फूट पडली असून, आयएमए अधिकृत पॅनेलच्या समर्थनार्थ भाजप प्रचारात सक्रिय झाला होता. यामुळे निवडणुकीला राजकीय रंग आला होता. भाजपने आपल्या प्रत्येत पदाधिकाऱ्याला किमान पाच डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले होते. या निवडणुकीच्या निकालीची उत्सुकता असणार आहे.
जळगावात एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे बॅनर झळकले आहे. जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक सह वेगवेगळ्या चौकांमध्ये प्रतापराव पाटील भावी आमदार, अशा आशयाचे बॅनर लागलेत.
बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नांदेडमधील इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केला निषेध. बागेश्वर धाम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय निषेधार्य असून छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान करणार आहे. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचं गुरू-शिक्षक किंवा मार्गदर्शक नव्हते. इतिहासाच्या कुठल्याही साधनांमध्ये रामदासांचा उल्लेख नाही, असे इतिहास अभ्यास डाॅ. श्रीमंत कोकाटे यांनी म्हंटलं आहे.
हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा 'जय शिवाजी' हा भव्यदिव्य मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त रितेश देशमुख व अभिनेत्री जेलिना देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा इथल्या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याठिकाणी आले होते. आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधान मी काही ऐकलेले नाही. परंतु महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही, असे रितेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
इराणविरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका युद्धादरम्यान इस्त्रायलने आॅपरेशन विंग्ज आॅफ डाॅन मोहिमेअंतर्गत मणिपूरमधील बेने मेनाशे समुदायाच्या 240 लोकांना आपल्या देशात नेले आहे. गेल्या 20 वर्षांत या समुदायाच्या चार हजार सदस्यांनी स्थलांतर केले आहे. तर 2030 पर्यंत आणखी सहा हजार लोकांना नेण्याची योजना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.