Vijay Wadettiwar : 'हरियाणा, जम्मू-काश्मीर जिंकणारच'; वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील विजयाचा आकडा सांगितला

Vijay Wadettiwar claims that the Congress MVA will get a majority in the Maharashtra Assembly elections : हरिणाया, जम्मू काश्मीर पाठोपाठ महाराष्ट्रात महाविकास आघाडी कसं बहुमत मिळवणार, यावर काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSakarnama
Published on
Updated on

Mumbai News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हरियाणा आणि जम्मू काश्मीर काँग्रेस महाविकास आघाडी बहुमताने जिंकत असून, महाराष्ट्रात देखील 200 पारने जिंकू, असा दावा केला.

महाराष्ट्रातील असंविधानिक सरकारला हद्दपार होणार आहे आणि जनताच त्यांना घालवणार असल्याचा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधाल. त्यावेळी त्यांनी महायुती सरकार जोरदार हल्ला चढवला. राज्यातील महायुती सरकारला असंविधानिक सरकार म्हणत, भाजपच्या जातीच्या राजकारणाला महाराष्ट्रासह देश वैतागला आहे. या जुमलेबाज सरकारला आता युवा हद्दपार करणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा येतील, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Radhakrishna Vikhe : 'काय बोलतात याचं भानच नाही'; राहुल गांधींवर मंत्री विखेंचा निशाणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारच्या करत असलेल्या इन्व्हेंट बाजीवर देखील विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. "मोठ मोठाले स्टेज करून त्यावर रॅम्प लावून त्यावर ‘रॅम्प वॉक’ सरकार करत आहे. सरकार पैशाची उधळपट्टी करत आहे. या योजनेतून माझ्या बहिणींना त्रास दिला जात आहे. 'पैस हवे असतील, तर गाडी बसा', असा फर्मान अधिकाऱ्यांमार्फत महिलांना पाठवला जातोय", असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. हे दीड हजार रुपये एका पिशवीत टाकून दुसऱ्या पिशवीतून काढून घ्यायचं, असा धंदा या सरकारने चालवला आहे, असा घणाघात देखील विजय वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेंचा युवा भिडू ठाकरेंची 'पेटती मशाल' हाती घेणार

'नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लाट होती. आता त्यांचा फुगा फुटला आहे. आता महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांनी विजयाची निवडून येण्याची शक्यता हा निकष लावून तयारी करत आहे. त्यानंतर जागेवर निर्णय होईल', असे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे एकमत झाल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 'खोटारडेपणा यांची विचारधारा आहे. 'डीएनए'मध्ये खोटारडे आहे. भाजप गेली दहा वर्षे सत्तेत आहे. सत्तेत बसून अजूनही काँग्रेसवर आरोप करत आहे. गांधी, नेहरूंना आजही जबाबदार धरत आहे. मग सत्तेत कशाला बसले. पाप, भ्रष्टाचार, देशाची तिजोरी साफ यांनी करायची आणि काँग्रेसकडे बोट दाखवायचे, भाजपचे हे धंदे जनतेने ओळखले आहे', असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

किती खोटं बोलावं...

'शेतीमालाला भाव मिळत नाही. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतीमालाला डबल भाव देत असल्याचे जाहीरपणे म्हणत आहेत. नतद्रष्ट लोक पंतप्रधानांना चुकीची माहिती देत असावेत. याचून पंतप्रधान शेतीमालाला डबल भाव देत असल्याचे खुशाल म्हणत आहे. पंतप्रधानांनी याची माहिती घ्यावी, म्हणजे त्यांना वस्तुस्थिती समजेल', असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

मोदींचा परतीचा प्रवास सुरू

'नागपूरमधील मेट्रोला परवानगी काँग्रेसनेच दिली होती, याची आठवण विजय वडेट्टीवार यांनी करून दिली. महाराष्ट्राला गुजराती जोडीनं उद्धवस्त केलं आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे, हे कोणाचा कोणाला पायपोस नाही. खोक्यांचं सरकार आहे. महाराष्ट्र आणि झारखंड देखील बहुमताने जिंकणार आहोत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल आम्हाला अपेक्षित आहे. 2024 मध्ये मोदींच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चारही राज्यात सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींना सत्ता सोडावी लागेल, हे जनतेनं ठरवलं आहे. हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी बहुमताने जिंकत आहे', असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com