

CTET 2026 NEWS: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE कडून CTET सप्टेंबर 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, इच्छुक उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अधिकृत माहितीनुसार, अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 पासून सुरू झाली असून 10 जून 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
CTET म्हणजे Central Teacher Eligibility Test. देशभरातील केंद्रीय शाळा आणि अनेक राज्यांमधील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
सर्वप्रथम ctet.nic.in या वेबसाइटवर जा
होमपेजवरील CTET September 2026 Application लिंकवर क्लिक करा
नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा
त्यानंतर अर्जातील इतर तपशील पूर्ण करा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
निर्धारित परीक्षा फी ऑनलाइन भरा
अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट सुरक्षित ठेवा
डीएलएड (D.El.Ed) किंवा बीएड (B.Ed) शिक्षण घेतलेले उमेदवार
शिक्षक भरतीसाठी पात्रता मिळवू इच्छिणारे विद्यार्थी
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक होऊ इच्छिणारे उमेदवार
अर्ज सुरू : 11 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख : 10 जून 2026
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट : ctet.nic.in
परीक्षा पद्धत: ही परीक्षा देशातील १३२ शहरांमध्ये २७ भाषांमध्ये घेतली जाईल.
परीक्षा शहर: यावेळी अर्जामध्ये परीक्षा शहर निवडण्याची तरतूद नाही. CBSE द्वारे संगणकीय पद्धतीने (Randomly) परीक्षा केंद्र वाटप केले जाईल. एकदा मिळालेले शहर बदलता येणार नाही.
प्रवेशपत्र: परीक्षेच्या दोन दिवस आधी डाउनलोड करता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.