Radhakrishna Vikhe And Milk Price : मंत्री विखेंचा दुधाच्या भावासाठी 'नुस्खा'; अमूल सहकार्य करणार?

Radhakrishna Vikhe suggested solution for milk price : राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुधाच्या भावाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक उपाय सुचविला आहे. अमूल समूहासह दूध प्रक्रिया केंद्रांनी पुढाकार घेतल्यास दुधाला भाव देता येईल, असा उपाय आहे.
Radhakrishna Vikhe And Milk Price
Radhakrishna Vikhe And Milk PriceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्‍यातील अतिरिक्‍त दूध प्रश्‍न आणि त्यातून निर्माण झालेला दूध भाव वाढ मागणीमुळे महायुती राज्य सरकारची डोकेदुखी वाढलीय. अतिरीक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुस्खा पुढं केला असून, त्यांनी दूध प्रक्रिया केंद्रांना साद घातली आहे.

अमूल उद्योग समूहासह दूध प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त 20 लाख लिटर दुधाचे संकलन करावे, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना 35 रुपये भाव देणे शक्‍य होईल, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

राज्‍य सरकारने दूधाच्‍या (Milk) दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्‍यात तातडीने लागू करता यावा, यासाठी मंत्री विखे यांनी विशेष प्रयत्‍न सुरु केलेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने राज्‍यासह बाहेरच्‍या राज्‍यात जाणाऱ्या दुधाला सुध्‍दा सरकारने लागू केलेले दर मिळावेत, यासाठी मंत्री विखे यांच्‍या उपस्थितीत मुंबईत दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठक झाली. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरुज येथील युनियनचे प्रतिनिधी आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe And Milk Price
MIM In Ahmednagar : असदुद्दीन ओवैसींचा आदेशच घेऊन जिल्हाध्यक्ष परतले; 'एमआयएम' आता धडकी भरवणार

मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 3-5, 8-5 फॅटसाठी सरकारने ठरवून दिलेला 35 रुपयांचा दर लागू करावा, असे आवाहन केले. दर लागू करण्‍यासाठी काही अडचणी असल्‍यास विभागाकडून सोडविण्‍यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल, अशी ग्‍वाही दिली. ज्‍याप्रमाणे राज्‍यातील प्रक्रिया केंद्राना दूध पावडर उत्‍पादनासाठी दिले जाणारे अनुदान परराज्‍यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळा,वे अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केल्‍यानंतर याबाबत सरकार सकारात्‍मकतेने विचार करेल, असे मंत्री विखे यांनी आवर्जुन सांगितले.

Radhakrishna Vikhe And Milk Price
Sujay Vikhe : सुजय विखेंच्या मागणीला ग्रीन सिग्नल; निष्कर्षाकडे लक्ष अन् धाकधूक वाढली

सद्यपरिस्थितीत राज्‍यात अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रक्रिया केंद्रानी 20 लाख लिटर दुधाचे संकलन करण्‍यासाठी सहकार्य करावे. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्‍न मार्गी लागेल. तसेच आर्थिक नुकसानही टळेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करतानाच दुधाला हमीभाव मिळावा यासाठी राज्‍याने केंद्र सरकारकडे प्रस्‍ताव पाठविला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी आपण व्‍यक्तिगत भेटलो असून याबाबत लवकरच धोरणात्‍मक निर्णय होईल, असा विश्वास मंत्री विखे यांनी बैठकीतील प्रतिनिधींसमोर व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com