महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या छाप्यांत काय सापडले? प्राप्तिकर विभागाचा मोठा खुलासा

सहकारी साखर कारखान्यांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर हे छापे पडले होते.
Income Tax
Income Taxsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागाची (Income Tax) छापेमारी कारवाई सुरु होती. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा बारामती अशा मोठ्या शहरांमधील कार्यालय आणि साखर कारखान्यांमध्ये हे छापे सुरु होते. मात्र आता अखेरीस ही कारवाई संपल्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्यातील एका बड्या राजकीय व्यक्तिशी संबंधित हे छापे होते. प्राप्तिकर विभागाने नेत्याचे नाव घेतले नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हे छापे पडलेले होते, हे जगजाहीर आहे.

Income Tax
पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे अन् गृहमंत्री म्हणाले...

स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य केले होते. अजित पवार म्हणाले होते, आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचे काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात बोलेन. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? कॅश सापडते का? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी झाली की मी यावर बोलेण.

Income Tax
राष्ट्रवादी म्हणते, आयकर नव्हे ‘भाजप आयकर विभाग’

आयकर विभागाला या कारवाईमध्ये काय सापडले?

जवळपास ७० ठिकाणी टाकलेल्या या छाप्यात आयकर विभागाला १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. आणि ही बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे. तसेच या छाप्यात बेकायदेशीर रित्या रक्कम फिरवण्यात आल्याचे आयकर विभागाला आढळून आले आहे.

ही रक्कम संबंधितांनी मुंबईत मोक्याच्या जागी कार्यालयाची इमारत खरेदी करण्यासाठी, दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी, गोव्यात रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी, राज्यात विविध ठिकाणी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. तसेच २ कोटी १३ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४ कोटी ३२ लाख रुपयांचे बेहिशेबी दागिनेही जप्त करण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com