दोडामार्ग नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगणार मूळ भाजप आणि राणे समर्थकांमध्ये!

नगराध्यक्षपदासाठी भाजपचे नगरसेवक राजेश प्रसादी आणि भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे.
Narayan Rane-BJP
Narayan Rane-BJPSarkarnama

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचे (bjp) नगरसेवक राजेश प्रसादी आणि भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन चव्हाण यांनी अर्ज दाखल केला असला तरी नगराध्यक्ष कोणाला करायचे, हे सभागृहातील नगरसेवकच बहुमताने ठरवणार आहेत. (Election for post of Dodamarg council chairman will be held among original BJP-Rane supporters)

भाजपकडे १७ पैकी १४ सदस्य असल्याने पूर्ण बहुमत आहे. अर्थात आज घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता चेतन चव्हाण यांचे पारडे आजच्या घडीला जड आहे. चव्हाण यांनी मागच्या वेळेला उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते, तर प्रसादी यांनी सरपंच आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. दोन्ही उमेदवार भाजपचे असले तरी मूळ भाजप आणि राणे समर्थक गट अशी लढत दिसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. ११ फेब्रुवारी) कोण अर्ज मागे घेतो? ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Narayan Rane-BJP
दूध पंढरीचा आखाडा : बळीराम साठे, दिलीप माने, आवताडेंची उमेदवारी ‘गॅस’वर!

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज नेले होते; पण तो दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी दिली. अर्ज दाखल करतेवेळी तालुका निरीक्षक मंदार कल्याणकर, तालुका प्रभारी एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, नगरसेवक तथा गटनेते नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर, सोनल म्हावळणकर व संध्या प्रसादी आदी उपस्थित होते.

Narayan Rane-BJP
राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; भाजपच्या निवडणूक सूत्रधाराचा प्रवेश, नगराध्यक्षांचे पतीही संपर्कात

चेतन चव्हाण यांच्या बाजूने १४ पैकी १० नगरसेवक राहिले. एका बाजूला संतोष नानचे आणि सोनल म्हावळणकर, तर दुसरीकडे राजेश आणि संध्या प्रसादी असे चित्र होते. त्यामुळे नानचे आणि प्रसादी यांच्यासमोर सूचक आणि अनुमोदक मिळवण्याचा प्रश्न उभा राहिला. अखेर नानचे यांनी माघार घेतली आणि त्यानंतर प्रसादी आणि चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. आजची राजकीय घडामोड पाहता नगराध्यक्ष म्हणून चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com