Kirit Somaiya news: सोमय्यांचा 'तो' दावा प्रदुषण मंडळाने खोडून काढला; परबांना दिलासा

दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून न्यायप्रविष्ठ आहे.
Kirit Somaiya, Anil Parab
Kirit Somaiya, Anil Parabsarkarnama

Kirit Somaiya Sai Risort news Update : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोपामुळे हे प्रकरण सध्या चांगलचं चर्चेत आहे. असे असतानाही किरीट सोमय्या यांनी रिसॉर्टच्या सांडपाण्याबाबत केलेला दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचा अहवाल सादर करत पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांचा दावा खोडून काढला आहे.

किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने रिसॉर्टचे सांडपाणी पाणी थेट समुद्रात जात नसल्याचा अहवाल दिला होता. तरीही सोमय्या आरोप करत होते. त्यांच्या या दाव्यानंतर काल महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. यावेळी साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दापोली उपविभागीय अधिकाऱ्यानींही यापुर्वीच सरकारकडे याबाबतचा अहवाल सादर केला होता.

Kirit Somaiya, Anil Parab
'जिथे माझे चुकत नाही तिथे आपण झुकत नाही' ; ओमराजे निंबाळकरांचा सूचक इशारा

रिसॉर्टपासून काही अंतरावर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी टाकी बांधण्यात आली आहे. ही टाकी समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली असल्याने त्या टाकीला कोणताही पाईप जोडून सांडपाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे या पाहणीत दिसून आले. यामुळे सोमय्या यांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, आता ईडीनेही तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच यांना मुळ दप्तर घेऊन कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने मुरुड ग्रामपंचायतीची पुन्हा एकदा झाडाझडती करत तपासासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक विद्यमान सरपंचाही यांना मूळ दप्तर घेऊन चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे.

किरीट सोमय्यांचा यापूर्वीही यु टर्न

साई रिसॉर्टचे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी भला मोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट पाडण्यासाठी दापोलीत गेले होते. ते रिसॉर्ट पाडणार का? याबाबत सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच सोमय्यांनी मात्र रिसॉर्ट बाहेरच्या काही अंतरावर गाडी पार्किंगसाठी लावलेल्या टाइल्सवर प्रतीकात्मक हातोडा मारला आणि काही मिनिटातच तिथून निघून गेले.

Kirit Somaiya, Anil Parab
सोमय्यांना दुहेरी धक्का; पाडकाम थांबले अन् परब दाखल करणार खटला

तर मी दापोलीत जाऊन अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडणार, असल्याचे दावे सोमय्या दोन दिवसांपासून करत होते. पण त्यांनी अवघ्या काही तासातच पलटी मारली. आपण हॉटेलवर नाही तर परब यांनी सरकारी जागेत केलेल्या बेकायदेशीर कामावर हातोडा मारल्याचा उल्लेख करत त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. त्यामुळे सोमय्यांनी केलेल्या गाजावाजाचा चांगलाच पचका झाल्याची दापोलीत चर्चा सुरू होती.

दरम्यान, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयानेही रिसॉर्टचे पाडकामाला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. तसेच, न्यायालयाच्या आदेशाशिवाय रिसॉर्टवर कोणतीही कारवाई करण्यासही स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळीही सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन आले होते पण न्यायालयाच्या निर्णयानंतर यांनी तिथून काढता पाय घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com