Sawantwadi Assembly Election 2024 : जनतेने सुचवलेली विकासकामे पूर्णत्त्वास - दीपक केसरकर

मतदारसंघात या भागातील जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जनतेने सूचविलेली विकासकामे पूर्ण झालेली आहेत.
Sawantwadi Assembly Election 2024 deepak kesarkar over development works completed
Sawantwadi Assembly Election 2024 deepak kesarkar over development works completed
Published on
Updated on

वेंगुर्ले : मतदारसंघात या भागातील जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जनतेने सूचविलेली विकासकामे पूर्ण झालेली आहेत. आपल्या भागात काजू व काथ्या व्यावसायांना प्रोत्साहन देण्यात आले असून यातून अनेक महिलांनी रोजगार निर्माण केला आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी तुळस येथे केले.

परिपूर्ण विकास साधण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांना विकासकामांची माहिती द्या. पुढील आठ दहा दिवस माझ्यासाठी काम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. श्री. केसरकर यांचा तुळस व आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये रविवारी (ता.१०) गावभेट दौरा पार पडला. यात त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती विष्णुदास उर्फ दादा कुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,

जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सुहास कोळसुलकर, तुळस सरपंच रश्मी परब, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, भाजपचे सुधीर झांटये, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस उपसरपंच सचिन नाईक, भाजपचे अणसुर सरपंच सत्यविजय गावडे आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘माझे सर्व काम जनतेसमोर आहे. त्यांना ते माहित आहे, म्हणूनच मतदारांचे माझ्यावरील प्रेम कधी कमी झालेले नाही. या भागातील जनतेशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. निवडणूक फक्त निमित्त असून माझा मतदारसंघ माझे कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेतोय.’’

श्री. वालावलकर म्हणाले, ‘‘राज्यातील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांत करोडो रुपयांची कामे केसरकर यांनी केली आहेत. चांदा ते बांदा व सिंधुरत्न योजनेतून तळगाळातील सर्वसामान्य जनतेला घरबसल्या करता येणारे व्यवसाय ७५ टक्के सबसिडीच्या माध्यमातून केसरकर यांच्या प्रयत्नामुळे मिळाले आहेत. युवक, महिला, मच्छीमार, शेतकरी व महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे.’’

महिला आघाडी तालुकाध्यक्ष पडवळ म्हणाल्या, ‘‘आपसातील वाद किंवा कुरघोड्या काही दिवस बाजूला ठेवूया. आज एकदिलाने काम करण्याची गरज आहे. लोकसभेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून येथे महायुतीचा दबदबा निर्माण करूया.’’

तालुकाप्रमुख मांजरेकर म्हणाले, ‘‘पाच वर्षांत तुळस पंचक्रोशीतील गावासाठी कोणकोणत्या कामांसाठी किती व कसा निधी दिला याचा आढावा घेतला. हा भाग आंबा बागायती व शेतीसाठी ओळखला जात असल्याने या गावात कृषी पर्यटनाची संकल्पना राबविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनीच त्याच्या विजयात सहभागी होऊया.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com