Beed News: लक्ष्मण हाकेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप; मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावताहेत...

Laxman Hake Allegations Against Sharad Pawar On Maratha Reservation: शरद पवार त्यांच्या तोंडी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचे नाव असते, त्यांनी आरक्षणाबाबत पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. आमच्या चार पिढ्या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यांनी काहीच भुमिका घेतली नाही.
Laxman Hake allegations against Sharad Pawar
Laxman Hake allegations against Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : आरक्षणासाठी मनोज जरांगे तर लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. लक्ष्मण हाके यांनी आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शरद पवार हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, असा आरोप हाके यांनी केला आहे.

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गावगाडा विस्कळीत होत असताना ते काही बोलत नाहीत, हे न कळलेलं कोड आहे. ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन फक्त पोहे खाऊन आले का? असा सवाल हाके यांनी केला आहे. बीडच्या चकलंबा गावात ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.

"शरद पवार त्यांच्या तोंडी नेहमी शाहू- फुले-आंबेडकरांचे नाव असते, त्यांनी आरक्षणाबाबत पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. आमच्या चार पिढ्या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यांनी काहीच भुमिका घेतली नाही," असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपली 'भूमिका' निभावली आहे. त्यावरून त्यांच्या पाठीमागे कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, असा टोला हाके यांनी लगावला.

Laxman Hake allegations against Sharad Pawar
Jayant Patil: मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे कोण होते? जयंत पाटलांचा भाजपला थेट सवाल

हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर सोमवारी हल्लाबोल केला. 'सरकारने लाडकी बहीण लाडक्या भावा सारखीच मनोज जरांगेसाठी लाडका आंदोलक नावाची योजना जाहीर करावी. विरोधकांनी देखील ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी लेखी हमी द्यावी असे हाके म्हणाले.

ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे. लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या संरक्षणात खिरापत वाटल्यासारखे कुणबी सर्टिफिकेट वाटले जात असल्याचा आरोप केला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com