Maharashtra Politics News live: दररोज सरासरी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात? राज्य सरकारनं विधान परिषदेत आकडाच सांगितला

Sarkarnama Headlines Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
 Farmers suicide.jpg
Farmers suicide.jpgSarkarnama
Published on
Updated on

दररोज सरासरी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात? राज्य सरकारनं विधान परिषदेत आकडाच सांगितला

महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येचा गंभीर विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं याबाबतची मोठी कबुली दिली आहे. राज्यात हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे २०२४ मध्ये रोज सरासरी सात प्रमाणे वर्षभरात २,७०६ शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सभागृहात मंगळवारी(ता.11)दिली.

लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना..., शिवसेना नेत्याचं मोठं विधान

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील, असे विधान केले आहे.

मोठी बातमी: पुणे शहरातील वाहतुकीची समस्या सुटणार, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती

पुणे शहरातील दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच चालली आहे.त्यामुळे ठिकठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी झालेली पाहायला मिळते. पण आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अहवाल सादर; मंत्री सरनाईक यांची सभागृहात माहिती

पुण्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली. या अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली होती. 

Pune News : महापालिकेची पुण्यातील सिंहगड कॉलेजवर मोठी कारवाई

महापालिकेची थकबाकी थकवल्या प्रकरणी पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यातील विविध ठिकाणच्या सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त करण्यात आल्यामुळे हा संस्थेला मोठा दणका पालिकेने दिला आहे. 345 कोटींची सिंहगड कॉलेजकडे थकबाकी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh : दिवंगत सरंपच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत

पंढरपूरच्या गादेगाव ग्रामस्थांचा मदतीचा हात म्हणून मस्साजोगच सरंपच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत केली आहे.

BJP Politics : विधानपरिषदेसाठी भाजपची 3 नावं ठरली, सुत्रांची माहिती

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी दिल्लीला तीन नावे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये माधव भंडारींसह दोन नावांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. यामध्ये दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींच्या नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

Satish Bhosale : खोक्या प्रकरणी बीडच्या शिष्टमंडळाने घेतली अजितदादांची भेट

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणी बीडच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. शिरूरमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चानंतर ढाकणे पिता पुत्रावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतची माहिती दिली. या शिष्टमंडळाने सतीश भोसलेची कुंडलीच अजितदादांसमोर मांडली. यावेळी उपमुख्यमंत्र्‍यांनी खोक्याला आजच अटक करण्याचा शब्द दिला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पहिली सुनावणी बुधवारी (ता.12) केज जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या प्रमुख आरोपांचे जबाब 18 प्रमाणे घेण्यात आले आहेत. तर साक्षीदाराचे 164 प्रमाणे जवाब घेतले आहेत. साक्षीदारांचे कलम 18 चे जबाब कोर्टासमोर सादर केले जातील. तर आरोपींचे जबाब बंद लिफाफ्यामध्ये सादर केले जातील.

गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी

पुण्यात रस्त्यावर अश्लील कृत्य करून फरार झालेल्या आणि नंतर मग पोलिसांनी अटक केलेल्या गौरव आहुजाला १४ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली गेली आहे.

विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारला साधला निशाणा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत बोलताना निधीवरून महायुतीला चिमटा काढला आहे. सरकारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे मात्र सर्वाधिक निधी अजितदादांकडील पक्षांना दिला जात आहे, असं ते म्हणाले आहेत.

Ravindra Dhangekar : धंगेकर यांच्याबाबत युतीधर्म कसा पाळायचा : पुण्यात भाजप पदाधिकारी नाराज

पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून ‘व्हॉटस ॲप’ ग्रुपवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रवेशावर भाजपकडून नाराजी व्यक्त करताना आतापर्यंत चार वेळा पक्ष बदलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या धंगेकर यांच्याबाबत युतीधर्म कसा पाळायचा असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे.

Deputy Collector : राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याशिवाय राज्यात लवकरच ८० अतिरिक्त जिल्हाधिकारी पदही भरण्यात येणार आहेत. गेली आठ वर्षांपासून राज्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली होती.

Ajay Munde : घराचे काम सुरू असल्याने धनंजय मुंडेंची आई नाथ्रा गावी राहत आहेत : अजय मुंडे

आमच्या कुटुंबाची सध्या बदनामी सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या घराचे काम करण्यात येत आहे, त्यामुळे आई नाथ्रा येथील गावातील घरी राहत आहे. धनंजय मुंडे यांना कारण नसताना बदनाम केले जात आहे. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असा पलटवार धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही त्यांच्यावर नाराज असेल, त्यांची आई (बाई) दीड वर्षापासून नाथ्रा गावी आहेत, त्या अजून आलेल्या नाहीत, असा आरोप सुरेश धस यांनी केला हेाता. त्याला अजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

निलंबित आमदार अबू आझमी यांची छत्रपती संभाजीराजे यांना आदरांजली

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शहादत दिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात निलंबित आमदार अबू आझमी यांना आदरांजली वाहिली.

आम्हाला देशभक्ती व निष्ठा कोणीही शिकवू नये... आम्ही न्यायसुद्धा छत्रपतींच्या नावाने आणि आदर्शांवर मागतो, आणि तुम्ही फक्त आज पर्यन्त छत्रपतींच्या नावावर राजकारण करतायेत! जय हिन्द! जय महाराष्ट्र! जय समाजवाद! असेही ते पुढे म्हणाले.

अजित पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का: राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवली

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना नाशिक बाजार समितीमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर दाखल असलेला अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे. संचालक शिवाजी चुंभळे यांच्या गटाने पिंगळेंना हा धक्का दिला आहे.

पक्षीय पातळीवर बघायचे तर राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवून टाकली आहे. १८ पैकी १५ संचालकांनी देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. यात या सर्वांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. आता लवकरच बाजार समितीचा सभापती ठरविला जाणार आहे.

Prashant Koratkar live:  एकदाही तपास अधिकाऱ्यासमोर हजर नाहीत

प्रशांत कोरटकरचा जमीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी सुरू आहे. प्रशांत कोरटकर तपासाला सहकार्य करत नसल्याने राज्य सरकारच्या वकीलाचे म्हणणं आहे. आत्तापर्यंत एकदाही तपास अधिकाऱ्यासमोर हजर न झाल्याने तपासात अडचणी येत असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

Raju Shetty live: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विधान भवनावर मोर्चा 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी कांदा , कापूस , तूर, सोयाबीन फेकून आंदोलन केले. त्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणाव होता. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Beed Crime News : सतीश भोसले उर्फ खोक्या अद्याप फरारच! बीड पोलिसांनी गाडी केली जप्त

बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडची दुसरी सावली निर्माण झाली असून आता सतीश भोसले उर्फ खोक्याचे कारनामे समोर येत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या गेल्या चार दिवसांपासून फरार असून तो अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पण आता बीड पोलिसांनी त्याची गाडी केली जप्त केली असून ती सोमवारी (ता.10) रात्री अकराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आली आहे.

Vidhanparishad Eelection News : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर विधानपरिषदेत पाच जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या जागांवर कोणाचा नंबर लागणार याकडे आता लक्ष लागले आहे. तर या निवडणुकीचे 27 मार्च रोजी मतदान पार पडणार आहे. भाजपच्या 3, राष्ट्रवादी अजित पवार 1 आणि शिवसेना शिंदे गटासाठी 1 जागा सुटली आहे.

Rajasthan Governor Haribhau Bagde News : 'बलात्कार करणाऱ्याला नपुंसक करा'; राज्यपाल बागडे भडकले

महिलांची छेडछाड करणाऱ्यांना मारहाण केली पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्यांना थेट नपुंसक करा असे मोठं विधान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी हे विधान देशात सध्या वाढलेल्या महिलांची छेड दुष्कृत्यांच्या घटनांवर केलं आहे.

Prashant Koratkar News : कोरटकरला उच्च न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश

Indrajit Sawant Threat Case : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. आज उच्च न्यायालयात कोरटकर यांच्या जामीनावर पुन्हा एकदा सुनावणी होणार असून कोरटकरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशिअसमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशिअस दौऱ्यावर असून ते राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. भारतीय उपखंडातील संरक्षण दलांचाही या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. भारतीय नौदलाचं जहाजसुद्धा यासाठी दाखल झालं आहे.

Maharashtra Weather News : राज्यात उष्णतेच्या तीव्र झळा वाढल्या?, 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात सध्या उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. अशातच विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक भागांत 11, 12 आणि 13 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Crime News : लघुशंका करणार्‍याला हटकणे पती-पत्नीवरच्या जीवावर बेतले, कोयत्याने सपासप वार

पुण्यातील येरवडा येथे बीएमडब्ल्यू गाडी भर रस्त्यात लावून लघुशंका केल्याचे प्रकरण ताजे असतानाच वडगाव येथे अशीच धक्कादायक घटना घडली आहे. येथे लघुशंका करणार्‍याला हटकणाऱ्या पती-पत्नीवर तिघांनी कोयत्याने सपासप वार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत.

Congress on Budget : 'पोकळ अर्थसंकल्प', कॉंग्रेसची टीका

अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.10) विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. त्यावर आता टीका सुरू झाली आहे. काँग्रेसने देखील यावर तिखट प्रतिक्रियी देताना महायुतीचा हा पोकळ अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला असल्याची टीका केली आहे.

Halal Vs Jhatka : हलाल विरुद्ध झटका, वाद पेटला; हिंदू दुकानातून मटण खरेदी करा, राणेंचं आवाहन

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आले असून मंत्री मंत्री नितेश राणेंनी नव्या वादाला सुरूवात केली आहे. राणेंनी हिंदू दुकानातून मटण खरेदी करा असे हिंदू समाजाला आवाहन करत हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादाला हवा दिलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com