Maharashtra Latest Live : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर…

Marathi Breaking News : राज्यातील आणि देशातील राजकीय आणि प्रशासकीय महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
Live Update
Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

‘MPSC’चा मोठा निर्णय, आता अर्ज प्रक्रियेत होणार ‘डिजिलॉकर प्रणाली’चा वापर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेसाठी 'डिजिलॉकर' प्रणाली स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता उमेदवारांना कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने सहज सामायिक करता येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेसाठी 'डिजिलॉकर' प्रणाली स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेतला असून आता उमेदवारांना कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने सहज सामायिक करता येतील.१३ कोटींचे एमडी जप्त, अमली पदार्थांची खरेदी विक्री करणारी टोळी अटकेत

मिरा भाईंदर- वसई विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ यांनी धडक कामगिरी करत तब्बल १३ कोटी रुपये किंमतीचा ६ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करणारी टोळी पोलिसांनी अटक केली आहे.

तटकरेंच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा, शाहिद जंजिरकर नगराध्यक्ष!

गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीने भगवा फडकवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे शाहीद जंजिरकर यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

भोंदू बाबा मनोहर भोसले याला मदत करणारा कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक दांडे निलंबित

भोंदू बाबा मनोहर भोसले याला पुणे येथून अटक करून रात्री कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आणले असताना आरोपींना मोबाईल वरून बोलण्यासाठी मोबाईल देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेनेचे अहिल्यानगरचे संपर्कमंत्री

शिवसेनेचा अहिल्यानगरचा संपर्कमंत्री म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमाशी बोलताना अहिल्यानगरमध्ये अनेक ठिकाणी एमआयडीसी उभा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिकनंतर अहिल्यानगर उद्योजकांचे हब बनेल, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस नेत्याचा महिला अमदाराला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न

केरळमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी महिला आमदाराला सार्वजनिक कार्यक्रमात मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

शरद पवार शनिवारी सातारा दौऱ्यावर

ज्येष्ठ नेते शरद पवार हे येत्या शनिवारी (ता. ९ मे) सातारा दौरा करणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पवार हे साताऱ्यात येणार आहेत.

अगोदर बहुमताचा आकडा सादर करा : राज्यपालांची विजय यांना सूचना

तामिळनाडू विधानसभेत अभिनेते विजय यांच्या केव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत जादूई कामगिरी केली. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत १०७ जागा जिंकल्या आहेत. मात्र, बहुमतासाठी त्यांना आणखी ११ मतांची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी विजय यांनी दोनदा राज्यपालांकडे दावा केला आहे. मात्र, अगोदर बहुमताचा आकडा सादर करा, अशी सूचना राज्यपालांनी विजय यांना केली आहे.

राज्यसभेवर मला पाठवा, असा आग्रह धरणं चुकीचं आहे : छगन भुजबळ

राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचा निर्णय पक्ष घेईल. माझ्या दृष्टीने म्हणाल इथं माझ्याकडे मंत्रिपद आहे. राज्यात मी सिनियर मंत्री आहे, त्यामुळे मला राज्यसभेवर पाठवा, असा आग्रह मी धरणं चुकीचं आहे, असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

मुंबईतील त्या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे

मुंबईतील पायधुणीमध्ये कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, त्या चौघांच्या मृत्यूचे कारण समोर आले असून उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांनाही आपला जीव गमावावा लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या चौघांच्या शरीरात उंदीर मारण्याच्या झिंक फॉस्फेट या औषधाचे अंश आढळून आले आहेत.

Weather alert Update देशातील 13 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

देशातील 13 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरीसह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. .पुढील काही दिवसांपर्यंत जोरदार पाऊस, वादळी वारे आणि वीज कोसळण्याच्या अलर्ट जारी केलाय.10 ते 12 मे कालावधीत उत्तर पश्चिम भारतात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी या भागात ६-७ दिवसांपर्यंत मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे...बिहार, विदर्भ आणि तेलंगणामध्ये गारपिटीची शक्यता आहे...

Pimpri Chinchwad schools पिंपरी चिंचवडमध्ये 10 बोगस शाळा, शासनाची कोणतीही परवानगी नाही

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील 10 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता आपले कामकाज सुरू ठेवल्याने प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असं आवाहन केलं आहे. या शाळांना यापूर्वीच बंद करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही या शाळा अनाधिकृतपणे सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे.. शासकीय नियमांचे उल्लंघन करून शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थाचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिला आहे...

Nagpur Crime नागपुरात तहसीलदारांना मुरूम माफियानं जेसीबीला लटकवून 4 किलोमीटरपर्यंत नेले

नागपूरच्या कुही तालुक्यात मुरूम माफियांनी महसूल पथकावर जीवघेणा हल्ला केला आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना मुरूम माफियाने जेसीबीला लटकवून 4 किलोमीटरपर्यंत नेले. पोलिसांनी पाठलाग करून जेसीबी चालक मयूर थोटेला अटक केली असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

अदिती तटकरे या योजना अपडेट मंत्री आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

“नीलम गोऱ्हे यांना आमदारकी दिली नसती तर त्यांनी भाजपमध्ये ही उडी मारली असती. अदिती तटकरे या योजना अपडेट मंत्री आहेत का? की, महिला बाल कल्याण मंत्री आहेत हे ठरवावे. खरात, चाकणकर हे सगळे आता निष्पाप आहेत असे का वाटते?. एसआयटी वर आता फार विश्वास ठेवावा असे वाटत नाही, रुपाली चाकणकर यांना अजूनही ताब्यात घेतले जात नाही” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Raj Thackeray : दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी एक महत्त्वाची भेट गुरुवारी मुंबईत पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या भेटीचे काही फोटो समोर आले असून, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

बिनबुडाचे आरोप करणं थांबवा, किशोरी पेडणेकर संतापल्या

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकतीच एका मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. यामध्ये कोळी बांधवांचे हक्क आणि त्यांच्यावर होणारे अन्याय यावर भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोळी आणि आगरी बांधव हे मुंबईचे मूळ निवासी आणि पहिले नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्याचा विचार कोणी करत असेल, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. पेडणेकर यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे.

अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर अत्याचार; 60 वर्षीय आरोपी फरार

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात 10 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आई-वडील शेतात गेल्यानंतर आरोपीने गेल्या काही दिवसांपासून हे कृत्य केल्याचा आरोप आहे. मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे

Bihar News : मोदी पाटण्यात, बिहारमध्ये खळबळ! मंत्रिमंडळ विस्ताराचा 'हा' सस्पेन्स आज उलगडणार!

बिहारमध्ये आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणा येथे दाखल झाले असून पटनाच्या गांधी मैदानात हा शपथविधीसोहळा होत आहे. थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार आहे.

मराठा साम्राज्य नकाशाचा वाद हायकोर्टात

एनसीआरटीच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात त्या विरोधात कोल्हापूर, सातारामध्ये आंदोलन देखील झाले. आता या निर्णयाविरोधात मराठा राजघराण्यांच्या वंशजांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हा निर्णय मनमानी आणि ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करणारा असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठीआमंत्रित करायला हवे - प्रकाश आंबेडकर

तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून,राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. विजय यांना तामिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी योग्यरित्या आमंत्रित केले पाहिजे. त्यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी तमिळनाडूमध्ये सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे.

बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, निशांत कुमार होणार मंत्री

बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतो आहे. २८ मंत्रि आज शपथ घेणार आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

भोंदू अशोक खरातच्या विरोधात पहिले दोषारोपत्र सादर होणार

भोंदू अशोक खरातविरोधात एसआयटीकडून पहिले दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालीये. पुढील आठवड्यात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्यता आहे.

Pune News: लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सहा वर्षांनंतर शिक्षा

खेड तालुक्यात एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रोहन शंकर पालकर याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शिक्षेमध्ये दंडाच्या रकमेचाही समावेश आहे. ही घटना ६ मे २०२१ मध्ये घडली होती.

विरोधानंतर आता सरकारकडून हिंदी परीक्षेला स्थगिती

महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. ही परीक्षा 28 जून 2026 रोजी घेण्यात येणार होती. राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले होते. मात्र, या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्र, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून कडाडून विरोध झाला. या विरोधानंतर आता सरकारने या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bengal Breaking LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी टीएमसीने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com