

Chhatrapati Sambhajinagar : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन आणि त्यासाठीच्या मावेजा प्रकरणात 241 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना औरंगाबाद खंडपीठाने आज दुसरा दणका दिला. धाराशीव येथे अपर जिल्हाधिकारी असताना आपल्या अधिकारात नसताना सुनावणी घेतल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अविनाश पाठक यांना पन्नास हजार रुपये भरण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, विद्यार्थी, मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी एकजुटीने पुन्हा मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे. आता एक घाव दोन तुकडे, अशा पद्धतीने लढा द्यावा लागेल. त्यासाठी 16 मे रोजी अंतरवाली सराटीतून राज्यातील मोठ्या आंदोलनाची घोषणा आणि तारीख जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगीतले.
कांदा उत्पादक शेतकरी दर पडल्यामुळे हवालदिल झाला आहे, त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला ताकदीने एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. हे सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सारथी असो की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा विषय असो, कुठल्याच विषयाला सरकार गांभीर्याने घेत नाहीये. यातून मराठा समाजाच्या पोरांचे मोठे नुकसान होत आहे.
निदा खान ही ज्या नारेगाव भागात लपून बसली होती, त्या भागात अनेक अवैध धंदे चालतात. तिथे एमआयएमचा नगरसवेक आहे आणि त्याने निदा खानला मदत केली. त्यामुळे नाशिक पोलीसांनी ताबडतोब त्याला अटक केली पाहिजे. एमआयएम पक्षाने कायम शहरातील वातावरण खराब करण्याचे काम केले आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत औरंगाबादचा आग्रह धरण्याचे कारण काय? असा सवाल करत खैरे यांनी थेट एमआयएमवर बंदी टाकण्याची मागणीही केली.
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलापती यांना राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी निमंत्रण दिलं आहे. टीव्हीके पक्षाचे विजय यांना मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने (५), व्हीसीके २, माकप २ आणि भाकप २ अशा अकरा आमदारांनी पाठिंबा दिल्याने विजय यांच्याकडे त्यांच्या पक्षासह (१०७) ११८ आमदारांचे बहुमत झाले आहे, त्यामुळे राज्यपाल अर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. जोसेफ विजय उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ आहेत.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीला केरळमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे, त्यामुळे केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, काँग्रेस हायकमांडने पाठवलेल्या शिष्टमंडळापुढे सर्वाधिक आमदारांनी केसी वेणुगोपाल यांच्या नावाला पाठिंबा दिल्याची चिठ्ठी व्हायरल झाली आहे. मुकूल वासनिक यांच्या हातातील ती चिठ्ठी मीडियात व्हायरल झाली आहे.
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलापती यांनी तिसऱ्यांदा राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. टीव्हीके पक्षाचे विजय यांना मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने (५), व्हीसीके २, माकप २ आणि भाकप २ अशा अकरा आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे विजय यांच्या पक्षासह (१०७) ११८ आमदारांचे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे विजय यांनी तिसऱ्यांदा राज्यपाल अर्लेकर यांची भेट घेतली आहे.
करमाळ्याच्या मनोहर भोसले याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून आणखी एका भोंदूबाबाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी माढ्याच्या आडेगाव येथील नाना महाराज ऊर्फ गुरु माऊली विरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे सातारा दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही साताऱ्यात दाखल झाले आहेत. ते आज दरेगावात असणार आहेत, त्यामुळे साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील.
नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर केले. कोर्टाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिला काल पोलिसांनी अटक केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्रिपदासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नवनियुक्त आमदारांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
शिर्डीतील कोट्यवधींच्या जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी कल्पना खरात अद्यापही पोलिसांना गुंगारा देत आहे. महिना उलटूनही एसआयटीला तिचा शोध घेण्यात यश आलेले नाही. दरम्यान, अटकेत असलेला तिचा पती अशोक खरात आणि साक्षीदारांची आज पोलिसांनी समोरासमोर चौकशी केली. मात्र यावेळी आपण 18 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात असून पत्नी कुठे आहे हे आपल्याला माहिती नाही असा दावा खरातनं केलाय.
संजय शिरसाटांना आपण कवडीची किंमत देत नाही, निदा खान प्रकरणात पोलीसांना सहकार्य करेल अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे. निदा खानच्या अटकेनंतर संभाजीनगर मधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
नाशिकच्या tcs कंपनीत घडलेल्या धर्मांतर प्रकणातील फरार आरोपी निदा खानला एसआयटीने छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी याप्रकरणात एमआएएमचे नेते इम्तियाज जलील खरे सूत्रधार असल्याचा आरोप केला. त्यानंतर जलील यांच्या घरी पोलिस दाखल झाले आहेत. शिरसाट यांनी याप्रकरणात जलील हे सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे.
नरसापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटनांनी शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी निषेधाचे बॅनर्स लावत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या दहावीच्या निकालात यंदा 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने 97.62 टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला. मुंबई विभागाचा निकाल 94.97 टक्के, तर पुणे विभागाचा 94.24 टक्के लागला. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी 88.41 टक्के नोंदवला गेला. यासोबत नियमित, पुनर्परीक्षार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला.
पुणे शहरात महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. ताज्या अहवालानुसार, वर्षभरात 244 गुन्ह्यांची नोंद झाली असून देशातील महानगरांमध्ये पुणे पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. दिल्ली, जयपूर, मुंबई आणि हैदराबादनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. देशभरातील 19 महानगरांत महिला अत्याचाराचे 50 हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. जिल्हाभरात एकूण 45 अनधिकृत (बोगस) शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून लंके यांच्यावर अहिल्यानगरमध्येच उपचार सुरू होते.
पुण्यातील पठारेवस्ती, चंदननगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला करत तिचा ब्लेडने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये 2023 ते 2024 दरम्यान तब्बल 300 टक्क्यांहून अधिक वाढ होत ती संख्या 1,504 वर गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
नाशिकमधील'TCS' कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवार (ता.०८) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 01.00 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.