Maharashtra Political Update : 11 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करणार, जरांगेंचा इशारा

Political Breaking Live Headlines Updates : 11 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, यासह दिवसभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

सोलापुरात डॉल्बी सिस्टी लेजर लाईटवर बंदी

नागपूरनंतर आता सोलापुरात देखील डॉल्बी आणि लेजर लाईटवर बंदी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.13 ते 26 सप्टेंबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी आणि लेजर लाईट वापरावर बंदीचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश असून डॉल्बी आणि लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्यास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकींमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत.

11 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा - जरांगे पाटील

11 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, त्यानंतर उपोषण मागे घेतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यापुढे मी उपोषण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. यापुढे जर उपोषण केलो तर मी मरून जाईन. त्यामुळे जे काही आहे आहे ते आताच आहे, आताच मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार, असं मनोज जरांगे म्हणाले.

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण आदेशांची कडक अंमलबजावणी करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एनजीटीच्या ध्वनीप्रदूषण आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांकडे डॉ. कल्याणी मांडके, विवेक वेलणकर आणि निसर्गसेवक संस्थेचे पत्र दिलं आहे. ज्यामध्ये ध्वनीप्रदूषण नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉ. मांडके यांनी एनजीटीकडे अर्ज केला होता. २०२४ मध्ये पुण्यातील गणेशोत्सवासाठी एनजीटीने नऊ महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. गणपती मंडपाजवळ ध्वनीची पातळी मोजून नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करणे बंधनकारक. विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख चौकांमध्येही ध्वनीची पातळी मोजण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय नियमांचे उल्लंघन झाल्यास साऊंड सिस्टीम जप्त करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे एनजीटीचे निर्देश आहेत.

11 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा जरांगे पाटलांचा इशारा

11 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com