

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया गेटवर जात आम्हाला विद्यार्थ्यांसोबत आहोत, असल्याचा मेसेज द्यायचा होता. मात्र, सरकारकडून त्याला परवानगी न मिळाल्यानं आता आम्ही गांधी स्मृतीस्थळी दाखल झाले. तसेच विरोधी पक्षाच्या खासदारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
अभिनेता सलमान खानने गुरुवारी(ता.23) ट्विट करत पहिल्यांदाच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रोखठोक भाष्य केलं आहे. यात त्याने ''दिल्लीतील आंदोलनाचा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातला आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये. याचं संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
तसेच मला खात्री आहे की, सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. हे सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल. सलमाननं आता उपोषण मागे घ्यायला हवं असं म्हटलंय. विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे आणि मित्र सोनम वांगचुक यांनीही आपलं उपोषण सोडावं, हवं तर मी तुझ्यासाठी घरचं जेवणही पाठवतो, असं भावनिक सादही सलमान खानने घातली आहे.
जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या, प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी भाजप आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांना घेराव घालत आहेत. त्यांची ही कृती हुकूमशाही वृत्तीची आहे. एकुणच सत्ताधाऱ्यांची वागणूक पाहिली तर भारतात आता लोकशाही नावापुरतीच राहिली आहे, असे दिसते, अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर केली.
एकीकडे नीट पेपर फुट प्रकरणी राजधानी दिल्लीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे फेर परीक्षेचा निकाल संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. 16 जुलै रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मराठवाड्यातील बीडमध्ये काही विद्यार्थ्यांनी अन्सर की आणि ओएमआर शीटमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने परीक्षा घेणाऱ्या एनटीएला नोटीस बजावत त्या दोन्ही विद्यार्थ्यांची मूळ उत्तरपत्रिका कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सहकाराची नवी क्रांती 'भारत टॅक्सी'मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज विरोधात कल्याण मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विरोधात आंदोलन केलं. रास्ता रोको केला, केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळा जाळला. अनेक कार्यकर्त्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या आंदोलनामुळे एकच गोहोतची परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घेतली असून बचाव व मदतकार्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्यात आली आहे. अंधेरी येथून रवाना झालेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक तलासरी येथे दाखल झाले असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने आवश्यक त्या ठिकाणी बचाव व मदतकार्यामध्ये कार्यरत आहे.
'महाराष्ट्र सायबर' यांच्या निर्देशानुसार नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशन येथे अशा 12 बँक खाते धारकांवर व त्यांचे खाते आणि त्या खात्यांना हाताळणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये फसवणुकीची रक्कम सुमारे ४० लाख रुपयांहून अधिक स्वतःच्या फायद्यासाठी तत्काळ एटीएम किंवा चेक द्वारे काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आणि संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
धाराशिव शहरात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी व दगडफेकीची घटना घडली असून या दगडफेकीत दुचाकी चार चाकी व दुकानांचे ही नुकसान करण्यात आले आहे.ही दगडफेक वैयक्तिक कारणातून जरी झाली असली तरी हिंदु मुस्लिम गटांमध्ये झाली असून यात कोण जखमी आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधी यांनी आंदोलन केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस कमिटी इथं जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. थेट काँग्रेसलाच आव्हान देत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कमिटीच्या दारात आंदोलनाला येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात संसद परिसरात एनडीए खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. "राहुल, लाज वाटू द्या" अशा घोषणांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या प्रियंका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत अशा वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही पोलिसांनी विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला. या घटनेची दखल घेत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या संविधान चौकात केली निदर्शने. 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात घोषणाबाजी करत संविधानाच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अभिजीत दीपके यांची प्रकृती खालावली असून त्यांना ताप आला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ट्विट करून माहिती दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कामातून काही तासांचा ब्रेक घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. ही महत्त्वाची अपडेट समोर आली असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यावर तातडीची कारवाई केली. अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना घटनास्थळावरील जबाबदारीतून हटवून त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मला ताप आणि शरीरात तीव्र वेदना होत आहेत, तरीही वेदनाशामक औषधे घेऊन मी काम करत आहे. आज मी जंतर-मंतरवर दिसले नाही तर क्षमस्व. मला थोडा वेळ विश्रांती घेऊन प्रकृती सुधारायची आहे. संध्याकाळपर्यंत मी पुन्हा आंदोलनस्थळी हजर असेन, असे ट्विट अभिजीत दीपके यांनी केले आहे.
दिल्लीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 23 जुलै महाराष्ट्र बंदच्या हाकेला पुण्यात ही प्रतिसाद मिळाला.पुण्यातील भिडे वाडापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशनपर्यंत हा मोर्चा जाणार आहे.यावेळी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो", "दिल्ली पोलीस मुर्दाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ पर्यंत राहील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे
विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र आले आहेत. ते रविवारी मुंबईत शिवाजीपार्कवरून भव्य मोर्चा काढणार आहेत.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, यात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता जाधव यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
संसद परिसरात NDAचे खासदार आणि विरोधक आमने-सामने... धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक... जोरदार घोषणाबाजी...तर विद्यार्थ्यांची काळजी होती तर पुन्हा लाठीचार्ज का केला? प्रियंका गांधींचा सवाल
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या कारवाईवरून प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला. सरकारविरोधातील रोष आता पोलिसांविरोधात जाईल असं वागू नका असं थेट इथारा त्यांनी दिलाय...
नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झालीये. पावसामुळे गोदावरीला पूर आला असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पूरपरिस्थितीमुळे काही नागरिक पाण्यात अडकलेय. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून, नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय....
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा बारामती मध्ये बसवण्यात आलेला आहे. याचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत केलं जाणार आहे. बारामती मधील तिरंगा चौकात नटराज नाट्यकला मंदिराच्या वतीने हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे.
आरएसएसचा एक गट संघर्ष झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करीत आहे, भीतीचे वातावरण तयार केले आहे. चौका- चौकात, नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे साडेतीन हजार कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आषाढी वारीत पंढरपुरात मोठा अवैध देशीदारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान 10 लाख 55 हजार रुपये किंमतीचा 155 बाॅक्स देशी दारू जप्त करण्यात आली आहे. पालखी मार्गावरून एका टेम्पो मधून बेकायदेशीर दारूसाठ्याची वाहतूक केली जात होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.