Maharashtra Politics Live Update : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास मी शांत बसणार नाही : मनोज जरांगे पाटील

Political Breaking Live Marathi Headlines Updates : बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरूवात, यासह आज रविवार दिनांक 12 एप्रिल रोजीच्या राज्यासह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politicssarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर शहरातील एका अविवाहित तरूणीवर अॅसीड हल्ला

पंढरपूर शहरातील एका अविवाहित तरूणीवर अॅसीड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्यात ती तरूणी गंभीर जखमी झाली असून तरूणीच्या चेहऱ्यावर अज्ञात तरूणांनी अॅसीड सदृश रसायन टाकले आहे. या धक्कादायक घटनेनंतर पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेत नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये अटक

नाशिकच्या मालेगाव शहरातील राहणाऱ्या रविंद्र पाटील या तरुणास तसेच त्याच्या भावाला व विहिनीला नाशिक महापालिकेत क्लार्क व सहाय्यक आयुक्त पदावर भरती करुन देतो असे नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या मुंबई येथील संदिप परब याला अटक करण्यात आली आहे. परब याच्यासह सचिन बबनराव चिखले, कृष्णा ठाकूर ह्या नाशिकच्या तरुणांही अटक करण्यात आली आहे. तर या तिघांनी तब्बल ५३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम उकळली आहे.

भीमाशंकर नंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? तीन महिन्यांचा प्रस्ताव

ज्योतिर्लिंग भीमाशंकरनंतर आता अष्टविनायकातील रांजणगाव महागणपती मंदिर काही दिवसांसाठी नव्हे तर तब्बल तीन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोयना जलाशयातील तीन पूलांची पाहणी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर येथून दौरा संपून दरे गावी मुक्कामासाठी आले. यावेळी संध्याकाळी त्यांनी कोयना जलाशयातील सर्वात महत्त्वकांक्षी असणाऱ्या तीन पूलांची पाहणी केली. पश्चिम महाराष्ट्रात ते कोकण असा जोडणारा मोठा केबल ब्रिज या कोयना जलाशयात होत आहे. साधारण जून महिन्यामध्ये हा केबल ब्रिज लोकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

करंजी घाटात दोन ट्रकचे अपघात; वाहतूक ठप्प...

करंजी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रकचे अपघात झाले. पुण्याहून बीडकडे प्लायवुड घेऊन जाणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्याने धोकादायक वळणावर उलटला, यात चालक किरकोळ जखमी झाला. तसेच गॅस टाक्या घेऊन जाणारा दुसरा ट्रक समोरून आलेल्या वाहनाला चुकवताना उलटून टाक्या रस्त्यावर विखुरल्या. या दुहेरी अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली असून धोकादायक वळणांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

इराणमधील ग्रीन प्लास्टिक तुटवडा, कल्याणमध्ये लाचखोरीचा प्रकार उघड; दोन कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई

इराणमधून आयात होणाऱ्या ग्रीन प्लास्टिकच्या तुटवड्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना पर्याय म्हणून साधा प्लास्टिक वापरावा लागत असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लाच उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास मी शांत बसणार नाही : मनोज जरांगे पाटील

मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्यात येतील, असं आश्वासन सरकारने दिलं होतं. त्यामुळे आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं. सरकारने शब्द न पाळल्यास मी आहे ना, सर्व गुन्हे मागे घेईपर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारला गुन्हे सरसकट मागे घ्यावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

नाशिकमधील धर्मांतराच्या घटनांबाबत टीसीएस कंपनीकडून स्पष्टीकरण

नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटना घडत होत्या, त्या प्रकरणी कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीत कोणत्याही प्रकारची छळवणूक आणि जबरदस्ती सहन केली जात नाही. कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सन्मान याची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो. नाशिकमधील प्रकरणाची माहिती मिळताच अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोप असलेल्या आठ कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबत करण्यात आले आहे.

आचार्य भोसले तू भोंदू वारकरी आहेस, तुझा बुरखा आता फाटलाय : विकास लवांडे

आचार्य तुषार भोसले तू भोंदू वारकरी आहे. वारकरी संप्रदायाचे कुणीही शंकराचार्य किंवा आचार्य नाहीत, फक्त हरी भक्ती परायण असतात. त्यामुळे आता तुझा बुरखा पूर्ण फाटलेला आहे. मात्र तू प्रतिगामी असल्याचे जाहीरपणे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! जे खळांची व्यंकटी सांडो! तया सत्कर्मी रती वाढो!!, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आचार्य तुषार भोसले यांना फटकारले आहे.

ऑपरेशन टायगर 12 महिने 24 तास चालूच आहे : शिवसेना मंत्र्याचं मोठं विधान

ऑपरेशन टायगर हे 12 महिने 24 तास चालूच आहे. फक्त आमदार खासदार, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना आमच्या पक्षात घेतलं म्हणजे ऑपरेशन टायगर नव्हे. सर्वसामान्य शिवसैनिकाना शिवसेना उबाठामध्ये मान मिळत नसेल आणि तो आमच्या पक्षात आला तर त्याला घ्यावंच लागतं. त्यामुळे आणखी कोण कोण येणार आहे, हे पाहण्यासाठी थोडं थांबा, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील दुरावा पुन्हा उघड

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा उघड झाला आहे. शिवसेना आढावा बैठकीत एकमेकांच्या शेजारी बसूनही त्यांनी बोलणं टाळलं आहे. शिरसाट हे व्यासपीठावर आल्यानंतर इतर आमदारांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. मात्र, सत्तार यांनी हस्तांदोलन करणंही टाळलं आहे.

एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर एकत्र येणे ठाकरेंच्या खासदाराने टाळले

धाराशिव येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे एकत्र येणार होते. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्चभूमीवर ओमराजेंनी एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणे टाळले. लातूर येथील कार्यक्रमाला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Eknath Khadase On NCP : 'सुनेत्राताईंना खुश करण्यासाठी कौतुक'; एकनाथ खडसे यांचा टोला

'अजितदादा जिवंत असताना त्यांचं पदाधिकारी कौतुक करत होते. अजितदादा मुख्यमंत्री होतील, अजितदादा भावी मुख्यमंत्री, अशा पद्धतीने राष्ट्रवादीचे पदाधिकारी बोलत होते. मात्र आता अजितदादा हयात नाही, आणि पक्षाचे सूत्र सुनेत्राताईंकडे आहेत. तर आता सुनेत्राताई यांना खुश करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं वक्तव्य केलं आहे', अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

Eknath Khadase : 'ऑपरेशन टायगर', पुन्हा-पुन्हा आणि वारंवार होत नाही; एकनाथ खडसे यांचा टोला

एकनाथ शिंदे शिवसेनेकडून, राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी, "हे एकदाच होतं, पुन्हा पुन्हा आणि वारंवार होत नाही. सर्वच्या सर्व खासदार निघून जातील, अशी तरी आता परिस्थिती नाही. यांनीच अफवा पसरवल्या आहेत."

Nandurbar Crime Update : नंदुरबारात हॉटेल व्यवस्थापकाचा मारहाणीत मृत्यू, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोदा रोडवरील हॉटेल व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. जुन्या वादातून काही युवकांनी हॉटेलमध्ये घुसून 25 वर्षीय व्यवस्थापक सागर जाधव याच्यावर लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत सागर जाधव याला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Shivsena : निलंग्यात शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात राडा; पक्षातील दोन्ही गट आमने-सामने..

लातूरच्या निलंग्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान राडा पाहायला मिळाला. मुंबईचे आमदार आणि संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत निलंगा शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन गट आपापसात भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यावर कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Congress Jalna : जालन्यात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान बैठकीत चांगलीच बाचाबाची

जालन्यात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ झाला. मी पक्ष निरीक्षकांना जाब विचारण्यासाठी गेले असता जिल्हाध्यक्षांनी मला बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नंदा पवार यांनी केला आहे. जालन्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची हकालपट्टी करण्याची महिला पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. जालन्यात काँग्रेस नेते हेमंतसिंह पटेल आणि खासदार कल्याण काळे यांचे उपस्थितीमध्ये संघटन सृजन अभियान बैठक आयोजित करण्यात आली होती.

Mumbai AQI Slips : मुंबईत पुन्हा वाढले प्रदूषण, धुरकट हवेमुळे मुंबईकरांचा कोंडला श्वास

काही दिवस स्वच्छ आणि श्वास घेण्यास सुलभ हवा अनुभवलेल्या मुंबईकरांना रविवारी पुन्हा प्रदूषणाचा सामना करावा लागला. सकाळपासूनच शहरात हलकं धुरकट वातावरण दिसून आले आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) पुन्हा ‘मध्यम’ श्रेणीत घसरला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळच्या SAMEER अॅपनुसार, मुंबईचा AQI 111 नोंदवला गेला. या पातळीवर दमा, हृदयविकार किंवा श्वसनाच्या समस्या असलेल्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते.

Devendra Fadnavis : धर्मांतर अन् लैंगिक शोषणाविरोधात सरकार गंभीर; मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

जळगाव आणि नाशिकमधील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीच्या आमिषानं महिलांचं लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतराचे प्रकारावर सरकार गंभीर आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संपूर्ण सत्य बाहेर आणतील आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra Coal Energy : छत्तीसगडहून पहिली कोळसा मालगाडी महाराष्ट्रात दाखल

छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर-2 कोळसा खाणीतून पहिली कोळशाची मालगाडी आज नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र इथं दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक मालगाडीचं स्वागत करण्यात आलं. यामुळे राज्याचं कोळशासाठी इतरांवरील अवलंबित्व कमी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आता महाराष्ट्राला अधिक उच्च दर्जाचा (GCV) कोळसा उपलब्ध होणार असून, त्यामुळे वीजनिर्मिती क्षमता वाढून उत्पादन खर्चही कमी होणार आहे. या कोळसा खाणीचं आयुष्य तब्बल 77 वर्षे असल्यामुळे भविष्यात राज्याला कोळशाची कमतरता भासणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Raj Thackeray : देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आशा भोसले यांना श्रध्दांजली वाहताना म्हटले आहे की, मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील. 

Sharad Pawar News : संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनांतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रध्दांजली वाहिली. आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली.आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील, अशी भावना पवारांनी व्यक्त केली.

ईश्वरी आवाज आपल्यातून निघून गेला-  देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरी आवाज हरपला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नारी शक्ती वंदन कायदा PM Modi यांचं सर्वपक्षीयांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले आहे. 2029ची लोकसभा निवडणूक महिला आरक्षणासह पार पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. 16 एप्रिलपासून संसदेत या विषयावर विशेष चर्चा होणार असून, सर्व पक्षांनी एका सुरात पाठिंबा द्यावा, अशी विनंती पंतप्रधानांनी केली आहे. हा ऐतिहासिक निर्णय देशहिताचा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांकडे पाठिंबा मागितला आहे.

CM पदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पुर्ण होईल : आदिती तटकरे

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होईल असं विधान मंत्री आदिती तटकरेंनी केलंय..बारामतीत प्रचारसभेत बोलताना त्या भावूक झाल्या होत्या...दुसरीकडे सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमचीही इच्छा आहे असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय....

Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. आज, 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मल्टी ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

एकाच विकासकामाचे दोनदा भूमिपूजन, भाजप-शिवसेनेत श्रेयवाद

कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला–म्हाडा परिसरातील 120 फूट डीपी रोडचे दोन दिवसांत दोनदा भूमिपूजन करण्यात आले. शिंदेंच्या शिवसेनेचे ) आमदार प्रकाश सुर्वे यांना काल भूमिपूजन केले होते. तर आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून भूमिपूजन करण्यात आले.

केवायसीच्या बहाण्याने शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल

लाडकी बहीण योजनेची केवायसी करणाच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गोकुळ चव्हाण याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवलं,  चौकशीचे आदेश

छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर गड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवण्यात आलं होतं. सुदैवाने अपघात झाला नाही. दरम्यान, या प्रकरणाचे डीसीजीए चौकशीचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री यांनी पण या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ -इराण

पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठीची शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेने अतिरेकी आणि बेकायदेशीर मागण्या केल्याचा आरोप केला आहे.

इराणसोबतची चर्चा निष्फळ : जेडी व्हान्स

अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी इराणने त्यांच्या कोणत्याही अटी मान्य न केल्यामुळे इराणसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्याचं जाहीर केलं आहे.

आशा भोसलेंची तब्येत खालावली, ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल

आशा भोसले यांना छातीतील संसर्गामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती आशा भोसलेंची नात जनाई भोसले यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य एकनाथ शिंदेचे जंगी स्वागत करणार आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर शिंदेच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरूवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात होणार असून कान्हेरीतील मारूती मंदिरासमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com