

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मेट्रोभवनचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पुण्यातील मेट्रो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. तसेच पुणेकरांना मेट्रो सेवा आवडली असून सध्या दररोज अडीच लाखांवर लोक मेट्रोनं प्रवास करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मेट्रोमुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याचंही ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून मे 2017 मध्ये सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यात विशेष दर्जा ही भेद नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.त्या निर्णयानंतर सरकारी वाहनांवरील लाल दिवे हटवण्यात आले होते. पण मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लाल-निळे फ्लॅश दिवे दिसल्यानं मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. अखेर हे गाडीवरील लाल दिवे दोन दिवसांपूर्वीच हटवल्याचा खुलासा मुंबई महापालिकेच्या महापौर कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
बारामतीची पोटनिवडणूक कदाचित बिनविरोध होऊ शकते. कारण आपल्या महाराष्ट्राला एक परंपरा आहे. जेव्हा अशी एखादी दुखद घटना होते, तेव्हा तेथील जनता बिनविरोधचा निर्णय घेत असते. पण सर्वच ठिकाणी बिनविरोध निवडणुका होतील, असं मला वाटत नाही, त्यामुळे काही ठिकाणी निवडणुका होतील, असे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मोजतबा खामेनी हे जीवंत नाहीत, असा दावा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच मोजतबा खामेनी जिवंत असतील तर त्यांनी शरण यावे, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली आहे. इराणकडून तडजोडीची भाषा केली जात आहे. मात्र, आम्ही इराणशी तडजोड करण्यास तयार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
धनगर समाजाला घटनेने दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी आम्ही उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानातून उपोषण आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. मल्हारराव होळकर यांची उद्या जयंती आहे, त्यांची आतापर्यंतची देशातील सर्वांत मोठी जयंती मुंबईत साजरी केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षणाचा लढा सुरू करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय हे नाशिक आणि नांदेडमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विभागाचे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संभाजीनगर अथवा मराठवड्यावर काय राग आहे, हे मला कळत नाही. मराठवाड्याचे मध्यवर्ती ठिकाण हे संभाजीनगर असताना काही कार्यालये नांदेड आणि काही कार्यालये नाशिक हलविण्याचा प्रयत्न आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यालय नांदेडला हलवायला काही हरकत नाही. पण बाकी सर्व त्याला संलग्न असलेली कार्यालये संभाजीनगरमध्येच आहेत. त्यामुळे हे कार्यालय संभाजीनगरमधून हलवू नये, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे, अशी मागणी विधान परिषदेचे माजी सभापती अंबादास दानवे यांनी केली आहे.
संसदेच्या दरवाजावर चहा पार्टी करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात साताऱ्यात भाजपकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी न होता, संसदेच्या दरवाजावर चहा पार्टी करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही निषेध करतो. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं, ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम आहेत. नागरिकांनी सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन सातारा भाजपकडून करण्यात आले.
जिल्हाअधिकाऱ्यांनी प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या कामाला सुरुवात झाली असून त्यासाठी सर्वसामान्यांना दर्शन बंद ठेवण्यात आला आहे, परंतू तरीही खासदार निशिकांत दुबे यांनी दर्शन घेतल्याने मोठे वादंग निर्माण झालेे होते.
दर्शनाला मंदिरात कुठल्या व्यक्तीने परवानगी दिली याची चौकशी करणार जिल्हाधिकारी यांची माहिती
प्रशासनची परवानगी नसताना कोणी परवानगी दिली यांची प्रांताधिकारी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश
भीमाशंकर मंदिरात खासदार निशिकांत दुबे यांनी दर्शन दर्शन घेतले होते; त्याबाबत तहसिलदार यांना चौकशीच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील बारामती आणि राहूरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक 23 एप्रिल ला मतदान पार पडणार आहे. दोन्ही ठिकाणची मतमोजणी 4 मे 2026 राजी होणार आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.य
राहूरीच्या जागेसाठी निवडणूक बिनविरोध होणार की नाही अजून स्पष्टता नाही..
5 राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला..
पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ, आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे,
पश्चिम बंगाल मध्ये 23 आणि 29 ला दोन टप्प्यात मतदान पार पडणार..
आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार
तमिळनाडूत एकाच टप्प्यात 23 एप्रिल ला मतदान पार पडणार..
5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 4 मे राजी जाहीर होणार..
राज्यातील बारामती आणि राहूरी या विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल ला मतदान पार पडणार आहे. दोन्ही ठिकाणची मतमोजणी 4 मे 2026 राजी होणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.
आसाम, पश्चिम बंगाल. तमिळनाडू, केरळ, आणि पद्दुचेरी या पाच राज्यात विधानसभेचा रणसंग्राम रंगणार आहे.
राज्यातील बारामती आणि राहूरी या जागांसाठी निवडणूका जाहीर होणार अशी शक्यता
पाच राज्यात 17 कोटींवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार
सर्व निवडणुकांचा निकाल 4 मे राजी जाहीर होणीर...
देशात ज्या गतिशीलतीने मेट्रो झाल्या आहेत त्यात पुण्याची मेट्रो देखील आहे. आज आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मेट्रोला आज घर मिळाले. मेट्रोला हक्काच घर मिळाले आहे. शहरात मेट्रोचे काम सुरू व्हायला उशीर झाला. मात्र नंतर अत्यंत वेगाने मेट्रोचे काम झाले. देशात ज्या गतिशीलतीने मेट्रो झाल्या आहेत त्यात पुण्याची मेट्रो देखील आहे. मेट्रो भवन असणं गरजेचं होते.
पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन. लग्नानंतर आठ महिन्यात तरुणीने आत्महत्या केली. ही घटना लोणीकंद परिसरात घडली. वैष्णवी जामकर अस आत्महत्या केलेल्या विवाहीत तरुणीचे नाव आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते महामेट्रो भवनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करून गौरविण्यात आले.
इराण युध्दामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतासह अनेक देशांती जहाजे अडकली आहेत. यातच आता भारतासाठी खुशखबर आहे. नंदादेवी व शिवालिक ही दोन जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत. उद्या ही जहाजे भारतीय बंदरावर दाखल होऊ शकतात. या जहाजांवर एलपीजी गॅस असल्याचे सांगितले जात आहे.
देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत घेतली जाणार आहे. आजच बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर होऊ शकतात.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राज्य सरकारनं अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3 हजार जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झालाय.
एअर इंडियाच्या दुबई,अबुधाबीच्या विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिडल ईस्टमधील युद्धामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुबईला जाणाऱ्या 6 पैकी 5 विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहे. अबुधाबीला जाणारी सर्व विमाने सध्या स्थगित करण्यात आली आहे. विमान फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल होताय.
विवाहितेवर अत्याचार करून तिला थेट गावच्या चावडीवर बांधण्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातल्या हिवरा पहाडी या गावात घडलाय. ही विवाहिता घरात झोपलेली असताना संशयीत आरोपी वैभव पेटकर यानं थेट तिला उचलून नेलं. तिला गावाबाहेर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर रात्रीच तिला गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवलं. रात्रभर ही महिला चावडीवर बांधलेल्या अवस्थेत होती. सकाळी गावकऱ्यांनी हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी वैभव पटेकरला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. वैभवला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या धक्कादायक घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने दुबईत अडकलेल्या धाराशिवच्या उमरग्याच्या चार ज्येष्ठ नागरिकांनी भारतात परतल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उमरगा इथल्या आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे व सुजाता दळगडे तसेच सोलापूर इथले सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवानंद माशाळकर व मीनाक्षी माशाळकर हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे अचानक बंद झाली आणि ते दुबईत अडकून पडले. या चौघांना तब्बल 1 लाख 56 हजार 996 रुपये खर्च करून मायदेशी परतावे लागले.
आखाती प्रदेशातील या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचा थेट फटका शेती क्षेत्रालाही बसू लागला आहे. विशेषतः सिंचनासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कच्चे तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळणाऱ्या काही घटकांपासून सिंचनासाठी वापरले जाणारे पीव्हीसी पाईप, ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य तयार केले जाते. सध्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे या साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन यंत्रणा, पीव्हीसी पाईप, मोटार पंप तसेच मोटार पंपासाठी लागणाऱ्या केबल्स यांच्या किमतीत सुमारे 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
इराणच्या किनाऱ्यावर अमेरिका जोरदार बॉम्ब वर्षाव करत राहील आणि इराणच्या बोटी व जहाजे सातत्याने उद्ध्वस्त करेल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करू, सुरक्षित आणि मुक्त करू, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझसाठी इराणविरोधात दंड थोपटले आहेत.
इराणध्ये आयतुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत मोठा दावा केलाय. मोजतबा खामेनी हे जिवंत नाहीत, असं मोठं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
अमेरिकन हल्ल्यात इराणच्या खार्ग बेटाचा मोठा हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. "आम्ही केवळ मनोरंजनासाठी देखील या बेटाला पुन्हा लक्ष्य करू शकतो," अशी प्रक्षोभक धमकीही त्यांनी दिली आहे. यानंतर संतापलेल्या इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य केलं. इराणने युएई (UAE), बहरीन आणि कुवेत मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला चढवला. इराणकडून इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करणे सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना इराण प्रत्युत्तर देत आहे.
त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा 2027चे आयोजन करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी 22 हजार 181 कोटी रुपयांच्या कामांना विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5 हजार 140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17 हजार 41 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अधिसूचना जारी करत, 'ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस कनेक्शन आहे ते आता 'एलपीजी' म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलिंडर मागवू शकणार नाहीत आणि ना नविन कनेक्शन घेऊ शकणार, नाही रिफिल करू शकणार आहेत. सोबतच ज्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी नंतरचे कनेक्शन परत करावे आणि कोणत्याही सार्वजनिक तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून सिलिंडर रिफिल घेण्यापासून देखील दूर राहावे, असे म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीपूर्वी कोलकातामध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले, सुरुवातीला वाद झाला, या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत आणि दगडफेकीत झालं. या धक्कादायक घटनेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
यूनियन बँक आॅफ इंडियाच्या 228 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रिलायन्स होम फायन्सास लिमिटेडचे माजी संचालक आणि अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल याची सलग दुसऱ्या दिवशी सुमारे पाच तास चौकशी केली. आरएचएफएल माजी सीईओ रवींद्र सुधाकर यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल झाले आहे.
अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या 11 भारतीयांविरोधात गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहे. दुकानांमध्ये दरोडा टाकणे, व्हिसाबाबत फसवणूक करणे, ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी इमिग्रेशन अर्जावर आपण गुन्हेगारीला बळी पडल्याचे खोटे सांगणे, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंदवण्या आले आहेत.
गॅस टंचाईमुळे शिर्डीतील साईबाब संस्थाच्या प्रसादालयातील भोजन व्यवस्थेत आणि लाडू प्रसादात कपात करण्यात आली आहे. वरण-भाताऐवजी मसाले भात, एक रस्सा भाजी आणि चपाती तसेच गुळ-शिरा भाविकांना प्रसाद म्हणून, तर एका भाविकाला एकच लाडू पाकीट देण्यास शनिवारपासून सुरूवात केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी इथल्या प्रस्तावित लोहखाण प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळान वन्यजीवविषयक परवानगी दिली. या प्रकलाप नागपूर इथल्या भाजप आमदाराची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे. अतिशय घाईघाईन परवानी देण्यात आल्याने या प्रस्तावाबाबत, राजकीय हितसंबंधांना प्राधान्य देण्यात आल्याची आता शंका उपस्थित केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.