Maharashtra Politics Live Update: मुंबई महापालिकेच्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे पत्राद्वारे मोठी मागणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : तामिळनाडूतील फटाका फॅक्टरीतील स्फोटात आतापर्यंत 23 कामगारांचा मृत्यू, यासह आज दिवसभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊ या.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

मुंबई महापालिकेच्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे पत्राद्वारे मोठी मागणी

मुंबई महापालिकेच्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे मोठी मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नगरसेवकांच्या मानधनवाढीची मुद्दा उपस्थित केला आहे. नगरसेवकांचं मासिक मानधन 1 लाख रुपये करण्यात यावं,अशी मागणी अब्राहानी केली आहे. नगरसेवकांचं 2017 पासून मानधन वाढवण्यात नसल्याचं म्हटलं आहे.

राहुरी पोटनिवडणुकीच्या सभेत फडणवीसांसमोर झळकले 'देवाभाऊ न्याय द्या'चे बॅनर

राहुरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिलेंच्या प्रचारार्थ सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही परीक्षार्थींनी बॅनर दाखवल्याचं समोर येत आहे. यावेळी बॅनरवर देवाभाऊ न्याय द्या, असा आशय लिहिलेला होता. लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदासाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांनी भरती प्रलंबित असण्याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. त्यावर,  मुख्यमंत्री फडणवीस यांनी उमेदवारांना तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू असा शब्द दिला.

'विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करुन 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला..':मुख्यमंत्री फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेत महिला आरक्षण नामंजूर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.यावेळी फडणवीसांनी विरोधकांनी नारीशक्तीचा मोठा अपमान केला आहे. मोदींनी उत्तर- दक्षिण असा कोणताही भेदभाव ठेवलाच नाही. विरोधक ठरवून आले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे बिल मंजूर होऊ द्यायचं नाही. विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करुन 70 कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

बारामतीत प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांची घोषणा 

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यावेळी जनता दरबारात मतदारसंघातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हा जनता दरबार पक्षाचे स्थानिक नेते सोडवतील , मोठे प्रश्न स्वतः जय पवार सोडवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अखेर नगरसेविका सहर शेख आल्या समोर; बनावट जात प्रमाणपत्राच्या चर्चेवर केला मोठा खुलासा

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख हे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. या दोघांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण आता माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तरं दिली असून जात प्रमाणपत्रे समोर ठेवून त्याबाबत खुलासा देखील केला आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांची गडचिरोलीत पदोन्नतीवर बदली

कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोलीत पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्रासाला कंटाळून नागरिक व व्यापाऱ्यांकडून गुंडाची भर रस्त्यात धुलाई..

एका सराईत गुन्हेगाराच्या गुंडगिरीला कंटाळलेल्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी गुंडाला बेदम चोप दिला आहे. सांगलीच्या मिरज या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. मिरज रेल्वे स्थानकाच्या समोर हा सर्व प्रकार घडला आहे. हुसेन उर्फ गुठल्या या सराईत गुन्हेगाराकडून मिरज रेल्वे स्थानक परिसरामध्ये आज दुपारच्या सुमारास रेल्वे प्रवाशांना धमकी देऊन लुटण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे संतापलेल्या व्यापारी नागरिकांनी मिळून गुंडाला रस्त्यातच बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी तब्बल 35 इच्छुक!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता, लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्याच्या विरोधकांच्या निर्णयात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या संघटनात्मक बांधणीसाठीच्या 'घटन सृजन अभियान'ची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून तब्बल ३५ जणांनी दावा केला आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून भाजप आणि शिंदे शिवसेना आमने-सामने

पंढरपुरात जिजामाता उद्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून भाजप आणि शिंदे शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. आज सायंकाळी येथील जिजामाता उद्यानाचे उद्घाटन भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वीच उद्घाटनाचा वाद समोर आला आहे. उद्घाटन कार्यक्रमाविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही असे सांगत थेट उद्घाटन कार्यक्रमावर शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार धक्का तंत्राचा वापर, बच्चू कडू यांना ऑफर

राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार धक्का तंत्राचा वापर केला आहे. शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा असून कडू आणि शिंदे यांची आज मुंबईत भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर याच भेटीत शिंदेकडू बच्चू कडूंना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर कार्यकर्त्या सोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे बच्चू कडू यांनी म्हटल्याचे सूत्रांची माहिती आहे.

टिटवळ्यात ५ कोटींच्या एमडी ड्रग्सचा साठा जप्त महिलेला अटक, ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का

टिटवळा परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एनसीबी आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून तब्बल ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त केला आहे. या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आंदोलनात भाजप पदाधिकाऱ्याकडून 'स्वतःच्या सरकार' विरोधात घोषणाबाजी

पिंपरी चिंचवड शहरात भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. यावेळी भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला.

Amravati Crime News : परतवाडा प्रकरणातील अयान अहमदची सोशल मीडियावर 'क्रेझ'

अमरावतीच्या परतवाडा इथल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आला असून, विशेष तपास पथकाच्या हाती मोठे तांत्रिक पुरावे लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावरील गुन्ह्याचे गांभीर्य वाढत असतानाच सोशल मीडियावर त्याची 'क्रेझ' वाढताना दिसत आहे.

Supriya Sule Replied CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांचे खासदार सुळेंनी आव्हान स्वीकारलं

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणचा संबध काय? 543 सदस्यांमध्ये महिला आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे, त्यात तुम्ही विधेयक आणले. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात डिबेट करायला तयार आहे. त्यांनी जी जागा सांगावी आणि वेळ सांगावी, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांचे आव्हान स्वीकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

Abhishek Kalamkar : लैंगिक शोषण प्रकरणात माजी महापौर अभिषेक कळमकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरोधात दाखल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिषेक कळमकर याच्याविरोधात, दोन अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Japan Earthquake : जपानच्या उत्तर भागात 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप

जपानच्या उत्तर भागात 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपान हवामान खात्याने तात्काळ इवाते, आओमोरी आणि होक्काइडो प्रांतातील किनारपट्टी भागासाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे. समुद्रात सुमारे 3 मीटर (10 फूट) उंचीच्या लाटा उसळण्याची भीती वर्तवण्यात आली असून नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

CM Devendra Fadnavis PC News : राज्यातून 1 कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू; CM देवेंद्र फडणवीस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघड करू. आम्ही महिलांचे एकत्रीकरण करणार आहोत. राज्यातून एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. आम्ही मेळावा बोलावला आहे. तिथे आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित करू. महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

America-Iran Crisis : इराणमधील Strait of Hormuzमधून 20 पेक्षा अधिक जहाजांचा प्रवास सुरू

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या Strait of Hormuz अनेक दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, संघर्ष काहीअंशी कमी झाल्यामुळे शनिवारी 20 पेक्षा अधिक जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ पार केले. 20 जहाजांनी सुरक्षित होर्मुझ पार केल्याने भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Nashik TCS : नाशिकमधील TCS कंपनी प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडून कठोर कारवाईची शक्यता

नाशिकमधील TCS कंपनी प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग अधिक सक्रिय झाला असून कठोर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. National Commission for Women च्या पथकाने सलग दोन दिवस या प्रकरणाची चौकशी केली. पथकाने संबंधित व्यक्तींची सुमारे सात तास सखोल चौकशी करून महत्त्वाची माहिती संकलित केली. त्यानंतर आयोगाच्या पथकाने थेट Tata Consultancy Services (TCS) कंपनीला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या चौकशीमुळे प्रकरणातील सर्व पैलू तपासले जात असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Heatwave : राज्यात उष्णतेची लाट तीव्र, पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला

राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढला असून अकोला जिल्ह्यात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे आणि वारंवार पाणी प्यावे, असे आवाहन केले आहे. हवामान विभागानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 25 तारखेपर्यंत तर विदर्भात 22 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

NCP MP Parth Pawar : '2 लाख 70 हजाराचा रेकॉर्ड मोडायचा'; पार्थ पवार

बारामतीत सांगता सभेच्या स्थळाची पाहणी सुरू आहे. सांगता सभा होणार आहे. इथं ऊन खूप आहे. राज्यभरातून अनेक लोक इथं येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. आम्हाला 2 लाख 70 हजारांचा रेकॉर्ड मोडायचा आहे, असा निर्धार अजित पवार राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी व्यक्त केला.

साताऱ्यात शिंदेंच्या सभेचे बॅनरवर महेश शिंदेंचा फोटोच नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात सभा घेणार आहेत. मात्र, या सभेला आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार नाहीत. त्यांचा या सभेतील बॅनरवर देखील फोटो नाही. त्यामुळे आमदार शिंदे हे शिवसेनेपासून अंतर राखत असल्याची चर्चा आहे.

संजय राऊत- राज ठाकरेंमध्ये बैठक

संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीले आहेत. दोघांमध्ये शिवतीर्थावर बैठक होत आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होत आहे याची माहिती नाही. मात्र, राज ठाकरेंनी महिला आरक्षणाबाबत जी भूमिका घेतली त्यासाठी त्यांचे आभार मानन्यासाठी राऊत गेल्याे सांगितले जात आहे.

सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेतला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार

बारामती पोटनिवडणुकीच्या उद्याच्या सभेला सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार सुप्रिया सुळे व इतर नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांनी दिली.

Nashik: खरातची चौकशी सुरु

भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात झाली आहे. आजच्या तपासात पुन्हा काही मेडिकल स्टोअर धारकांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्डरिंग, आज सुनावणी

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात आज दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध आहे.

Prajakta Tanpur: प्राजक्त तनपुरे थोड्याच कार्यकर्त्यांची बैठक

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे थोड्याच कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे नेमकी कुणाला पाठींबा देणार? हे लवकरच समजेल.

हातकणंगलेत पोलिसांवर दगडफेक; पोलीस वाहनांचे नुकसान

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावात दोन गटातील वादातून पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काँग्रेस नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना कानाखाली लगावली

कल्याणमधील काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी चक्क काँग्रेस पक्षाचेच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कल्याण काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत लोकल रूळावरून घसरली

डोंबिवलीत ऐन गर्दीच्या वेळी लोकल रूळावरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे लोकल प्रवाशांचा मोठी गैरसोय झाली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांकडून आज राळेगाव बंदची हाक

अमेरिकेत आठ मुलांचा गोळीबारात मृत्यू

माथेफिरू बापाने आपल्या आठ मुलांवर गोळीबार करत स्वत:ला संपल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे.

ZP मध्येही नगरपालिका, महापालिकांप्रमाणे नामनिर्देशित सदस्य नियुक्त करता येणार

अनेक वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेमधील स्वीकृत सदस्य नियुक्तीची पद्धत आता पुन्हा सुरू झाली असून, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अधिकृत अध्यादेश जारी झाला आहे. या निर्णयामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नव्या राजकीय संधींची चढाओढ सुरू झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या विधेयकावर अखेर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्याने आता जिल्हा परिषदांमध्येही नगरपालिका आणि महानगरपालिकांप्रमाणे नामनिर्देशित सदस्य नियुक्त करता येणार आहेत. तज्ज्ञ, अनुभवी आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय कार्यकर्त्यांना सत्तेच्या केंद्रात आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात असले, तरी खऱ्या अर्थाने पराभूत अथवा तिकीट न मिळाले त्याने नाराज झालेल्या अथवा वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना सभागृहात नेण्याचा हा ‘बॅकडोअर एन्ट्री’चा मार्ग असल्याचे बोलले जाते.

TCS प्रकरणातील दोन आरोपींना आज कोर्टात हजर करणार

TCS प्रकरणातील दोन आरोपी शफी शेख आणि रझा मेमन यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

तामिळनाडूतील फटाका फॅक्टरीतील स्फोटात आतापर्यंत 23 कामगारांचा मृत्यू

तामिळनाडू राज्यातील विरुधूनगर जवळ असलेल्या कट्टनरपत्ती गावात एका फटाका कारखान्यात रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ ठार झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com