Maharashtra News Live Update: बदलापूरात मच्छी विक्रेत्यांवरून सेना-भाजप आमने सामने

Marathi Headlines Updates : पेट्रोल-डिझेलची बचत करा, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Badlapaur News : उघड्यावर बेकायदेशीरपणे मच्छी विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

बदलापुरातील मच्छी विक्रेत्यांवरील कारवाईचा वाद चांगलाच पेटलाय. उघड्यावर बेकायदेशीरपणे मच्छी विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी घेतलीय. तर शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे मच्छी विक्रेत्यांच्या समर्थनात उतरले आहेत. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांवरून आता थेट सेना-भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Maratha Aandolan मनोज जरांगेंचा सरकारला 30 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “आमच्या मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य करा” असा अल्टिमेटम देत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

शरद पवारांकडून एआय शेतीची पाहणी

प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट

प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विषयी साम टिव्हीने वृत्त दिले आहे. १२ मे रोजी सुनील तटकरे यांच्यासोबत प्रफुल पटेल यांनी देखील पवारांची भेट घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव, इंदापुरमध्ये मुंबई लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शनिवार आणि रविवार उन्हाळी सुट्टीकरिता पर्यटक कोकणाच्या दिशेने निघाल्याने ही कोंडी झाली आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणी सीबीआयने तपासाअंती आणखी एकाला अटक केली आहे. ज्या लातूरच्या प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याने पेपर सेट केला होता, त्यानेच हा पेपर फोडला होता. सीबीआयने का कुलकर्णीची मागील दोन दिवसांपासून चौकशी करत होते. अखेरीस अटकेची कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com