मुंबईत पाऊस थांबला असला तरी आजारांचा धोका वाढला आहे. जानेवारी ते १४ जुलै या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. अनेक भागांत साचलेल्या दूषित पाण्यामुळे विशेषतः लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याने नागरिकांनी पाण्यातून चालणे टाळावे, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधक औषधे घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.