

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्ष बदल करणे योग्य नसल्याचे सांगत अण्णांनी राजकारणातील निष्ठा आणि ध्येयवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्ष बदल म्हणजे श्रद्धा नाही, निष्ठा नाही आणि ध्येयवादही नाही, असेच त्यातून दिसून येते. ज्यांच्याकडे देशासाठी आणि समाजासाठी काम करण्याचा ध्येयवाद असतो, ते कधीही पक्ष बदलत नाहीत. मात्र स्वतःचे हित साधणारे लोकच दल बदल करत असतात अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे.
लोकांची कामे होणे महत्वाचे होते. यासाठीच सत्तेत जावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेतच प्रवेश केला. पण मातोश्रीवर कुठलीही नाराजी नाही असे स्पष्टीकरण खा. संजय जाधव यांनी दिले आहे. तसेच त्यांनी काही अडचणी होत्या, शेवटी कार्यकर्त्यांची कामे होणं महत्वाचं असल्याचेही म्हटलं आहे.
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. अनेकदा शिवसेनेच्याच नेत्यांनी ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, आम्ही 2029 ची तयारी करतोय, असे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिंदेंचे ठरलेलं ऑपरेशन पूर्ण झाल्याची चर्चा आहे. अशातच आज त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे. या घोषनेनंतर आता शिवसेनेकडून मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघ फिक्स झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत यांचा विजय झाला असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांचा पराभव झाला आहेपालकमंत्री जय कुमार गोरे यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वसंत देशमुख यांनी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून वसंत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. महायुती आणि महाविकास आघाडी या लढतीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांना फक्त 118 मतं पडली आहेत. महायुतीच्या विजयानंतर पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता, अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. सोलापुरात गॉगलचे राजकारण संपले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अकलूज हे राजकारणाचे केंद्रबिंदू होते. आजही अनेक राजकीय घडामोडी अकलूज मध्ये घडतात. पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, अकलूजची सरंजामशाही चालणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या विजयाची सभा अकलूज मध्ये घेतली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचा सत्तेचा उन्माद दिसून आला. जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस, प्रमाणे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला. लोकशाही नाही तर ठोकशाही पद्धतीचे चित्र या निवडणुकीत दिसले. बळी तो कान पिळी प्रमाणे भाजपाची भूमिका असून आता विरोधी पक्ष व नंतर मित्रपक्ष संपवून वन नेशन, वन पार्टीकडे वाटलाच सुरु झालेली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
संजय दिना पाटील यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर त्यांची अधिकृत भूमिका मांडली. ते म्हणाले, मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावलं होतं, मी त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो. मला आमदारकी, खासदारकी द्या, म्हणून गेलो नव्हतो. 2014 ला प्रताप सरनाईक एबी फॉर्म घेऊन आले होते. मी त्यांच्याकडे आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो, अशा शब्दात पाटील यांनी खदखद व्यक्त केली आहे. मनसेला तिकीट द्यायचंय म्हणून मला उमेदवारी दिली,असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. तसेच माझ्या मुलीलाही उमेदवारी द्या म्हणून मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो.
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील अलिगंज येथे सोमवारी(ता.22) कोचिंग सेंटरच्या एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्यामुळे ही घटना घडल्याचं समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भीषण दुर्घटनेत २० ते २४ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नाशिक मतदासंघातील निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. महायुतीनं राज्यभरात दणदणीत विजय मिळवला आहे.मात्र, नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. दराडेंसाठी दोन मंत्र्यांसह महायुतीनं मध्यस्थी केल्यानंतरही अपक्ष गोकुळ गीतेंनी विजय मिळवला. या विजयानंतर गोकुळ गीते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा असून ते विशेष विमानानं मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत हेही आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे हेही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला चार आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बंडखोर खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश होईल. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार खासदार मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी हे खासदार असल्याचे समजते. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि संजय दिना पाटील हे दोघे अद्याप याठिकाणी पोहचले नसल्याचे समजते.
पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी मेट्रो स्टेशनखाली एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने दोन -तीन दुचाकी वाहनाना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन-तीन दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातामुळे नाशिक फाटा परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून भोसरी वाहतूक विभाग पोलिस आणि दापोडी पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
नाशिकच्या मनमाड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना सकाळी उघडीस आल्याने खळबळ उडाली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर-पुणे महामार्गावरीव ललवाणी पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड टाकून एका व्यक्तीची खून केला, तर दुसरी घटना याच महामार्गावरील अन्य एका ठिकाणी घडली. ज्यांचे मर्डर झाले ते बांधकाम मजूर असल्याची प्राथमिक माहिती असून, दिवसभर काम करुन ते रात्री कुठेतरी आश्रयाला थांबत असतात. या दरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात असून पोलिस याचा अधिक तपास करीत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी उद्या 23 जून रोजी होणार आहे. आरोपीच्या वकिलांकडून टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. 9/12चे टोल नाक्यावरील फुटेज पाहिजे आहे. तसेच आरोपीच्या वकिलांना सीसीटीव्ही फुटेज 10 एप्रिल 2025 रोजी दिले आहे, असे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. आरोपी न दिलेले वेगवेगळे 5 अर्ज सरकारी पक्षाने, यावर म्हणणे मांडले आहे. वेगवेगळे अर्ज करून प्रकरण पुढे ढकलले जात आहे. कलम 10 चा संदर्भ देत मकोका मधील प्रकरण हे प्राधान्याने चालवले जावे, अशी सरकारी पक्षाच्या वतीने मागणी. जयराम चाटे या आरोपीच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.
वाळू माफियायांच्या विरोधात आवाज उठवणारे नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांना अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी धुळे, सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केलं. गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. याच्याच तक्रारी सरपंच नारायण शिंदे यांनी प्रशासनाला केल्या होत्या.
पालघरमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिंदे शिवसेना आक्रमक झाली असून, आंदोलन करत शिवसैनिकांनी महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी महावितरणविरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर योजना तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना अवाजवी वीज बिले येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच स्मार्ट मीटरची सक्ती सुरूच ठेवल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढत राहू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी यावेळी दिला.
ओम राजेनिंबाळकर यांचा निर्णय काल झाला आहे. त्यांनी काल जाहीर केलं आहे. अगोदर कोणाचीही नाव विनाकारण बदनाम करण्याचा आमचा इरादा नाही. ओम राजेनिंबाळकर यांच्यामुळे महाविकास आघाडीची मत फुटल्याची चर्चा भाजप आमदार सुरेश धस यांनी फेटाळली. महाविकास आघाडीची मत का फुटली हे मविआला विचारा, असं आमदार धस यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांसाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आजच्या स्थितीला वजा 25 टक्क्यामध्ये गेलेल आहे. उजनीत सध्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या वजा 49 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट माथ्यावर पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळे उजनी वर अवलंबून असलेल्या पुणे जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.
कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर ) यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे!
सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ही लढाई सुरूच राहील,आमदारकी साठी माझी निवडणूक नव्हती लोकशाही वाचवण्यासाठी माझी लढाई सुरू होते, अशी भावना सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसनीय जगताप यांनी व्यक्त केली आहे.तसेच १०० मते ही अधिकची मत पडलेली आहेत,त्यामुळे महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी मतदार इच्छुक असल्याचा यातून स्पष्ट झाला आहे. सातारच्या दोन्ही मंत्र्यांनी मंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी मतदारांवर दबाव टाकला होता. त्यामुळेच आपला पराभव झाला, अशी टीका देखील जगताप यांनी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे यांचं नाव न घेता केली आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी दिली.
नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभ अत्यंत धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. विश्वासघाताची आमची संस्कृती नाही रक्तातच नाही, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतमोजणीला लवकरत सुरवात होणार आहे, महायुती आणि महाविकास आघाडीसाठी हे निकाल निर्णायक ठरणार आहेत. उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लवकरच विजयी उमेदवारांची नावे आणि राजकीय समिकरणे स्पष्ट होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.