
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या वित्त विभागाकडून अधिकृत निर्णय जारी केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. जानेवारी ते जुलै 2026 दरम्यानचा महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार असल्याचं या निर्णयात वित्त विभागानं म्हटलं आहे.
पुणे : अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. लोहगाव येथील ‘चूल मटन’ हॉटेलमध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने त्यांचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
नगर रस्त्यावरील जकात नाका, खांदवे नगर, लोहगाव येथील ‘चूल मटन’ची एफडीएकडून तपासणी करण्यात आली. या वेळी आस्थापनात स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यक निकषांची पूर्तता होत नसल्याचे निदर्शनास आले. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने एफडीएने आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित केला. सुधारणा होईपर्यंत अन्न व्यवसाय सुरू करू नये, असे निर्देशही दिले आहेत.
पुणे : प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट मुळा-मुठा नदीमध्ये सोडल्याने प्रदूषित होणारी नदी, प्रचंड वृक्षतोड, वाहतूक कोंडी, वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारे हवेचे प्रदूषण, कचरा जाळण्याचे प्रकार, वाढणारे बांधकाम क्षेत्र, आरएमसी व स्टोन क्रशर प्लांटमुळे हवेची दिवसेंदिवस ढासळणारी गुणवत्ता, तसेच वाढते ध्वनी प्रदूषण, या पद्धतीने पुणे शहराला जल, वायू व ध्वनी प्रदूषणाने अक्षरशः ग्रासले आहे. प्रदूषणामुळे नागरिकांची फुफ्फुसे निकामे होऊ लागली आहेत, असे असताना महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये प्रदूषण नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना नाहीत. त्यामुळे केवळ चकचकीत पर्यावरण अहवाल नको, तर नागरिकांना राहण्यायोग्य शहर कसे होईल, यावर भर द्या, अशा शब्दात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी पर्यावरण अहवालाबद्दल प्रशासनास धारेवर धरले.
मंचर : मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १८) कांद्याच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळाली. उत्तम प्रतीच्या कांद्याला १० किलोसाठी तब्बल ५५१ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
मंगळवारी बाजार समितीत कांद्याची सुमारे २५ हजार ४८० पिशव्यांची आवक झाली. बाजारातील कांद्याची आवक, प्रत आणि गुणवत्तेनुसार दर निश्चित होत असून, उत्तम प्रतीच्या कांद्याला चांगला उठाव मिळत आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकरासाठी (शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्ष) युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात यातून काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, निर्णय दिला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांच्या आधारेच मी निर्णय दिला आहे, त्यामुळे ते म्हणतील ते सत्य आहे, असे नाही. मी दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत निर्णय आहे, त्यामुळे त्यात बदल होईल, असे मला वाटत नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ झाला. बेळगाव हे कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी आणल्यानंतर मराठी भाषिक नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून मराठी आणि कानडी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. बेळगाव हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग असल्याची भूमिका मराठी नगरसेवकांनी मांडली.
काँग्रेस पक्ष नेहमी स्वतःचं वेगळं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण वंदे मातरम न गाणं हे त्याचं एक उदाहरण आहे. पार्लमेंटमध्ये एक बिल मंजूर झालं आहे, त्या विरोधात जाऊन त्यांना काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अंदुरे याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यावरून दाभोळकरांचे चिरंजीव हमीद दाभोळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.
नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये तब्बल १५ वर्षे सोबत राहणाऱ्या प्रियकराचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियसीने आपल्या नव्या प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल १८ तास घरातच ठेवण्यात आला आणि त्यानंतर मध्यरात्री कसारा घाटात नेऊन फेकण्यात आला.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १९ ऑगस्टच्या नाशिक दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनुसूचित जातीतील मोठ्या घटकांचा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध असल्याचा दावा रिपब्लिकन सेनेने केला आहे. केवळ एका घटकाच्या मागणीच्या आधारे निर्णय घेऊन उर्वरित ५९ उपजातींच्या भावना आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसह पक्षाच्या अधिकृत चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. पक्षांतरबंदी कायदा, १०वी अनुसूची आणि ‘मूळ पक्ष’ कोण, यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर न्यायालयात चर्चा सुरू आहे.
पुण्यातील घोले रोडवरील ‘महापौर निवास’च्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून ‘रामदूत’ नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ठाकरे गट आणि माजी महापौर संघटनेने विरोध केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ‘शिवनेरी’ नावाची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटातील वाद कायम आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना मानून चिन्ह दिले. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, आज त्यावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांना परीक्षा प्रक्रियेतील सुधारणांवर कठोरपणे लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यभरात ठिकठिकाणी एफडीएकडून धडक कारवाई सुरु आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एफडीएच्या कारवाईचं कौतुक केलं. भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरु आहे, याचा मला आनंद आहे. तसेच यापुढेही एफडीएची अशी धडक कारवाई सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर महापालिकेतील एका चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुख्य इमारतीत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही चोरी पैशाची नव्हे तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांच्या कार्यालयातच झाली असल्याचे समोर आली आहे. विरोधी नेत्यांच्या कार्यालयातील खुर्चा चोरीस जाण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. ही चोरी कोणा चोरट्याने नव्हे, तर कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड तालुक्यात नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय. दक्षता समितीच्या तपासात गोदामांमध्ये 3 हजार 400 मेट्रिक टन कांदा सडलेला आढळलाय. नियम धाब्यावर बसवून निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करण्यात आल्यानं सरकारची 6 ते 7 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला जामीन मिळाला आहे. जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे.
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 'स्कूल ठीक करो' या अभियानाची सुरुवात केली आहे. आज या अभियानांतर्गत अभिजीत दिपके पुन्हा हिंगोली जिल्ह्यात आले आहेत 15 ऑगस्ट रोजी लिंबाळा येथील शाळेत मुख्याध्यापक दारू पिऊन शाळेत झोपला होता शासनाच्या लक्षात अगोदर का नाही आलं आमच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली आहे, असे विधान अभिजीत दिपके यांनी केले आहे.
बेस्ट उपक्रमातील कर्मचारी, खासगी कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या BEST बसगाड्यांवरील वेट लीज कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी BEST Workers Union आक्रमक झाली आहे. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. ४२ कॅनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस येथील BEST Workers Union कार्यालयात हे आंदोलन सुरू होणार आहे.
सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अभिजीत दिपके यांनी लिंबाळा एमआयडीसी शाळेला भेट दिली होती या शाळेमध्ये मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गातच झोपत असल्याचा व्हिडिओ पुढे आला होता. दिपके यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने कार्यवाही करा, अशा सूचना दिल्या होत्या. प्रशासनानs या मुख्याध्यापकावरती निलंबनाची कार्यवाही केली.
शाहूवाडीच्या माजी आमदार व गोकुळच्या संचालिका संजीवनी देवी गायकवाड (वय ७१) यांचे आज सकाळी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे महिनाभरापासून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचार सुरू असताना सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागाळा पार्क येते त्यांचे वास्तव्य होते. पंचगंगा घाटावरील जुन्या वाड्यात त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथे काही काळ थांबून पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 15 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या प्रियकराचा मित्राच्या मदतीने गळा चिरून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री कारमधून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने कसारा घाटातून मृतदेह शोधून काढला. वसंत गोरखनाथ सातपुते (वय 40, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट टेंडरची वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचे मास्टरमाइंड संशयित तनय महाजन, नरेंद्र महाजन आणि शकील शेख हे तिघे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तनयने बँक खात्यात 2 कोटी 72 लाख तर नरेंद्रने रोख स्वरूपात 36 लाख 50 हजार आणि शकीलने बँक खात्यात 86 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या 40 प्रश्नांमध्ये जाती संदर्भातील प्रश्नाच्या तिथे एससी आणि एसटी प्रवर्गाचा उल्लेख आहे. मात्र, ओबीसी प्रवर्ग (OBC) असा स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता काँग्रेसने याच मुद्यावर मोठे अभियान सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या ओबीसी विभागाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसच्या बैठकीला ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जय हिंद यांच्यासह 7 राज्यामधील 300 जिल्ह्यांमधील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सहभागी होतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि राजस्थान या सारख्या निवडणूक असलेल्या राज्यांमधील ओबीसी पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांची पाहणी करून तेथील उद्योजकांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आज आदित्य ठाकरे हिंजवडी आयटी पार्क आणि तेथील एमआयडीसी परिसरातील पाहणी करणार आहेत. चाकण सारखेच मोठ्या प्रमाणात हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ते असते आणि रस्त्यावर पडलेल्य खड्ड्यांमुळे हिंजवडी मान आणि मारुंजी या आयटी पार्क परिसरामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आदित्य ठाकरे आज दुपारी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या आधी सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) समर्थित शहजाद भट्टी नेटवर्कविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत 14 राज्यांमधून 253 जणांना ताब्यात घेण्यात आले. या नेटवर्कविरोधात आतापर्यंत 80 हून अधिक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून, 200 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या आसपास देशात दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया करण्याचा कट उधळून लावला.
मुंबईतील नेव्ही नगरमध्ये नौदलातील जवान पुरणमल मेहरा याने पत्नी ओमा आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. पत्नी व दोन मुलांचा मृत्यू घातपाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरणमलने पत्नी ओमा आणि दोन महिन्यांच्या मुलगा दर्शचा उशीने गुदमरवून जीव घेतल्याचा संशय आहे. मोठा मुलगा यश याला विषारी पदार्थ दिल्याचा संशय असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुरणमलने घराच्या हॉलमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावाविरोधात आता स्थानिक तरुणही मैदानात उतरलेत. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तरुणांकडून आजपासून चाकणमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचा नगरसेवक मतीन मजीद शेख उर्फ पटेल या संशयिताचा नियमित जामीन अर्ज नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. संशयिताला 75 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोगळेकर यांनी हा आदेश दिला.
धाराशिवच्या कळंबच्या उप जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांना वारंवार केले जाणारे रेफर, तसेच रात्रीच्या वैद्यकीय सेवाबाबतच्या तक्रारींवर धाराशिव शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ज्यांना नोकरी करायची नाही, ज्यांना स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालवायचे आहे, त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा. मात्र सरकारी रुग्णालयात राहून रुग्णसेवेत हलकर्जीपणा करू नका आणि तो खपवून घेणार नाही, असेआमदार कैलास पाटील यांनी सुनावले.
यवतमाळ जिल्ह्यात मतदारांची एसआयआर मोहीम 17 ऑगस्टला थांबली. या एसआयआर मोहिमेत 2 लाख 65 हजार 816 मतदार सापडले नाही. या मतदारांची नावे आता जिल्हा संकेतस्थळावर पाठविण्यात आली आहेत. या मतदारांना नोटीस बजावल्या जाणार आहे. त्यावर हरकती मागितल्या जाणार असून, एक महिन्यात मतदारांकडून कुठलाच प्रतिसाद न आल्यास ही नावे वगळली जाणार आहे.
टाटा समूहाच्या सहकार्याने उभारलेल्या पुणे मेट्रो-तीनचे काम पूर्ण होत आले असून, त्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देशातील पहिली सार्वजनिक-खासगी भागीदारी मेट्रो म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते.
भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (ता.19) सकाळी 10 वाजता पंचवटीतील आडगाव नाका येथील स्वामी नारायण बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी आणि एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.