Marathwada Drought News : गर्दी जमविण्यासाठी राजकीय नेते अनेक कल्पना लढवतात. त्यातच सण समारंभ असतील तर राजकीय नेते हे संधी चुकवत नाहीत. परंतु त्यात अनेकदा सारासार विवेकाचा अभाव अनुभवास येतो. (BJP Political News) परभणीत विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक व माजी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे हे प्रतिवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. मंगळवारी, दि. १२ रोजी दहीहंडी उत्सवानिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.
विशेष म्हणजे त्याला प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच आहे. (Parbhani) पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने अनेक संघटनांनी पीकविमाच्या अग्रिम रक्कमेची आग्रही मागणी केली. (Marathwada) शासनाने जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी पंचवीस टक्के पीकविमा अग्रिम मंजूर केला आहे.
त्यातच लम्पीचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. प्रशासनाने पोळा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. (BJP) तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात बहुतांश गावात लाक्षणिक उपोषण, मुंडण या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.
अशा स्थितीत नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे, अशी टीका मराठा समाजातील युवकांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी परभणी शहरातील स्टेडीयम मैदानावर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. मात्र स्टेजजवळ जाण्याचा प्रयत्न करताना काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना पोलीसांच्या शिस्तीचा फटका सहन करावा लागला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.