मी काही इतक्या लवकर जात नाही..!कॅन्सरच्या निदानानंतर शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा

Sharad Pawar | Aurangabad | २००४ च्या निवडणूकांनंतर मला कॅन्सरचं निदान झालं होतं.
Sharad Pawar News, Sharad Pawar health issue
Sharad Pawar News, Sharad Pawar health issue

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजही वयाच्या 80 व्या वर्षी देखील राज्यभर दौरे करताना दिसतात. ते सत्तेत असोत किंवा नसोत, बहुमतात असोत वा अल्पमतात, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार 'फॅक्टर' सर्वाधिक महत्वाचा मानला जातो. (Sharad Pawar Latest Marathi News)

पण 2004 मध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी त्याच्याकडे फक्त सहा महिने असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितले होत. पण त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेला ही अंदाज खोटा करून दाखवला. सोमवारी (11 जुलै) औरंगाबादमध्ये शरद पवार यांच्या हस्ते मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे उद‌्घाटन झाले. या वेळी त्यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांचा डॉक्टरांशी झालेल्या संवादाचा एक किस्सा सांगितला.

Sharad Pawar News, Sharad Pawar health issue
अब नही कोई बात खतरे की..! एकाकी पडलेल्या राऊतांचं सूचक ट्विट

शरद पवार म्हणाले, “२००४ च्या निवडणूकांनंतर मला कॅन्सरचं निदान झालं होतं. यावेळी एक डॉक्टर माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला विचारलं, माझ्याकडे पाहून तुला काय वाटतं, मला काय झालं असेल? त्यावेळी त्याने सांगितलं की, खरं सांगू का…, मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगणार नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, तुमची काही कामं राहिली असतील, तर ती करून घ्या. त्यावर मी त्याला विचारलं, नेमकं काय म्हणायचंय तुला, मला समजलं नाही. त्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं की, तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य आहे.”

मी हसुन त्याला म्हणालो, लाव पैज… मी काही इतक्या लवकर जात नाही. अगदीच जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यावरच मी जाईन, त्यामुळे तू माझ्याबद्दल असा काही उल्लेख करू नको. आज २०२२ आहे आणि मी अजूनही जिवंत आहे. मी अजून जाग्यावर आहे, आजही देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो आणि लोकांची कामे करतो, असं शरद पवारांनी सांगितलं.

Sharad Pawar News, Sharad Pawar health issue
शरद पवार आणि रावसाहेब दानवे दिल्लीत एक कार्यक्रम ठरविणार....

एखाद्याला कॅन्सर झाला की त्याच्या घरातले वातावरण बदलून जाते. रुग्ण जाणार अशीच भीती निर्माण होते. पण आजाराला घाबरण्यापेभाया संकटावर आपण मात करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असते. हे युद्ध जिंकण्याचा निर्धार सर्वात महत्त्वाचा असतो. तरच या आपण संकटावर आपण मात करू शकतो.’ असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे या प्रसंगावर भाष्य करताना म्हणाले, ‘पवार साहेबांना कॅन्सर झाल्याचे कळताच आम्हा सर्वांच्या धक्काच बसला होता. पण पवार साहेबांनी आत्मविश्वासाने कॅन्सरवर मात केली आणि ऑपरेशननंतर अकराव्या दिवशी हेलिकॉप्टरने पुन्हा तितक्याच जोमाने प्रचाराला सुरुवातही केली. असा आत्मविश्वास प्रत्येक रुग्णाने बाळगला तर त्याच्यासाठीही या आजाराविरोधातील लढाई सोपी होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com