Assembly Session : राज्यातील 'सेतू सुविधा केंद्र' पुन्हा सुरू होणार

सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रमाणपत्रांबाबत ज्या सुविधा मिळत होत्या, त्या सेवा टेंडरची मुदत संपल्याने २१ डिसेंबरपासून बंद आहेत. (Mla Dhiraj Deshmukh)
Mla Dhiraj Dehsmukh
Mla Dhiraj DehsmukhSarkarnama

लातूर : राज्यातील तहसील कार्यालयातील 'सेतू सुविधा केंद्र' हे टेंडरची मुदत संपल्याने बंद झाले आहेत. (Latur) त्यामुळे नागरिकांना इतर ठिकाणी हेलपाटे मारत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Congress) याची दखल घेऊन आमदार धिरज देशमुख (Mla Dhiraj Deshmukh) यांनी राज्यातील 'सेतू सुविधा केंद्र' तातडीने पूर्ववत सुरू करा, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (ता. 22) लावून धरली.

त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 'सेतू सुविधा केंद्र' पूर्ववत करण्याबाबत लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार धिरज देशमुख यांनी लातूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात बंद असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडे लक्ष वेधले.

या केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी आता इतर ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत. अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत, त्यामुळे 'सेतू सुविधा केंद्र' तातडीने सुरू करा, अशी मागणी देशमुख यांनी केली. तहसील कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाचे केंद्र आहे.

तिथे आल्यानंतर सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रमाणपत्रांबाबत ज्या सुविधा मिळत होत्या, त्या सेवा टेंडरची मुदत संपल्याने २१ डिसेंबरपासून बंद आहेत. त्यामुळे होणारी गैरसोय राज्य सरकारने विचारात घ्यायला हवी आणि नव्याने टेंडर काढायला हवे. या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 'सेतू सुविधा केंद्र' पूर्ववत करण्याबाबत लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले.

Mla Dhiraj Dehsmukh
Shivsena : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी गैरफायदा घेत आहे...

राज्यातील सेतू सुविधा केंद्र बंद झाल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हे केंद्र पुन्हा सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी मी केली आणि राज्य सरकारने ती मान्य केली. सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे धिरज देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com