Aurangabad Central Assembly Election: प्रदीप जैस्वाल यांना माहेश्वरी आणि गुजराती समाजाचा जाहीर पाठिंबा

Pradeep Jaiswal Maheshwari Gujarati community support: हे तिन्ही उमेदवार त्यांच्या योग्य नेतृत्वाने समाजाच्या हितासाठी काम करतील आणि या तिघांची निवड महत्त्वपूर्ण ठरेल
Pradeep Jaiswal
Pradeep JaiswalSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Central Assembly Election : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना शहरातील माहेश्वरी आणि गुजराती समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाने या निर्णयाला एकमताने मान्यता दिली असून, याबाबत शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत प्रदीप जैस्वाल यांच्यासोबत शहरातील अन्य प्रमुख उमेदवार, अतुल सावे (पूर्व विधानसभा क्षेत्र) आणि संजय शिरसाट (पश्चिम विधानसभा क्षेत्र) यांनाही जाहीर पाठिंबा दिला गेला.

या महत्त्वपूर्ण बैठकीत माहेश्वरी समाज आणि गुजराती समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रदीप जैस्वाल, अतुल सावे आणि संजय शिरसाट यांना समाजाच्या पूर्ण समर्थनाची ग्वाही दिली.

Pradeep Jaiswal
Ausa Assembly Election: औसा शहरासाठी पाचशे कोटींचा निधी आणला, विरोधकांनी एक काम दाखवावे- अभिमन्यू पवार

समाजाच्या सदस्यांनी एकमताने असा ठराव घेतला की, हे तिन्ही उमेदवार त्यांच्या योग्य नेतृत्वाने समाजाच्या हितासाठी काम करतील आणि या तिघांची निवड महत्त्वपूर्ण ठरेल. यावेळी प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या भाषणात माहेश्वरी समाजाचे आभार मानले आणि त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

"माझ्या कामात आणि समाजाच्या प्रगतीत आपला भरपूर सहभाग असावा, अशी माझी इच्छा आहे. मी खात्री देतो की, आपल्या सर्व प्रलंबित प्रश्नांचे योग्य निराकरण करण्यास मी कटीबद्ध आहे.

त्याचप्रमाणे, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषत: माहेश्वरी समाजाच्या हितासाठी, मी आणि माझ्या कार्यक्षेत्रा पुढे जाऊन काम करू`, असे आश्वास प्रदीप जैस्वाल यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com