Aam Admi Patry, Aurangabad
Aam Admi Patry, AurangabadSarkarnama

Aurangabad : सहाशे चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करा ; `आप`ची मागणी

जनतेशी निगडीत अनेक समस्या, भ्रष्टाचारा बाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप देखील या निवदेनात करण्यात आला आहे. (Aurangabad Municipal Corporation)

औरंगाबाद : मुंबई महापालिकेने पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय औंरगाबाद (Aurangabad) महापालिकेने देखील घ्यावा, आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा, अशी मागमी आम आदमी (Aam Admi Party) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज आपने महापालिका (Municipal Corporation) कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासकांना निवदेन दिले आहे.

सर्वसमान्यांना हक्काचे घर मिळावे, त्यांना दिलासा मिळावा या हेतूने घेण्यात आलेल्या मालमत्ता कर माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी औरंगाबादेत करून न्याय सर्वांना समान असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

अल्प उत्पन्न गटाच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी मदत म्हणून मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिकेने देखील हा निर्णय घ्यावा, अशी मागणी आप ने केली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पंजाब राज्यात सर्वाधिक जागा जिंकत आम आदमी पक्षाने बहुमाने सत्ता हस्तगत केली.

दिल्लीनंतर आपने पंजाब हे देशातील महत्वाचे राज्य ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास बळावला आहे. आपचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजराज आणि हिमाचल प्रदेश राज्याच्या निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

तर इकडे त्यांच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नानावर रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुंबईच्या जनतेला पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे वचन आपल्या निवडणूक वचननाम्यात दिले होते.

सत्तेवर आल्यानंतर त्याची वचनपुर्ती करत त्यांनी तसा निर्णय देखील घेतला. आता मुंबई प्रमाणेच औरंगाबादेतील जनतेसाठी देखील सहाशे चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करत आपने आज महापालिकेसमोर आंदोलन केले. या संदर्भात महापालिकेचा ठराव घेऊन तात्काळ या संदर्भातले आदेश द्यावेत, असे देखील आप ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Aam Admi Patry, Aurangabad
Jalna : मागितले मेडिकल काॅलेज, मिळाले मेंटल हाॅस्पीटल..

जनतेच्या हितासाठी आम आदमी पक्षाने या संदर्भात निवदेन दिले होते, मात्र त्याला कचऱ्याची टोपी दाखवण्यात आली. यात कचुराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घातला कारणे दाखवा नोटीस द्यावी, त्यांच्याव शिस्तभंगाची कारवाई करावी, असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जनतेशी निगडीत अनेक समस्या, भ्रष्टाचारा बाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप देखील या निवदेनात करण्यात आला आहे. एकंदरित पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर आम आदमी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते चार्ज झाल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com