Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या औसा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आपण विधीमंडळात गेल्या पाच वर्षात शंभर टक्के उपस्थिती लावून जनतेचे प्रश्न तळमळीने मांडल्याचा दावा अभिमन्यू पवार आपल्या प्रचार सभा, गावभेटी आणि काॅर्नर बैठकातून करत आहेत.
गेल्या पाच वर्षात मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. याव्यतिरिक्त मागचे 5 वर्ष आमदार म्हणून मी जनतेसाठी सदैव उपलब्ध होतो, विधिमंडळात 100% उपस्थित राहून जनतेचे प्रश्न तळमळीने मांडले आहेत. 68 गावांच्या व संपूर्ण औसा मतदारसंघाच्या विकासासाठी जवळपास 3 हजार कोटींचा निधी खेचून आणल्याचेही पवार सांगतात. औसा मतदारसंघाचा विकासरथ असाच धावता ठेवण्यासाठी मला पुन्हा संधी द्या, असे आवाहन अभिमन्यू पवार करताना दिसत आहेत.
विकासापासून कायम वंचित राहिलेल्या कासार सिरसी मंडळातील 68 गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागचे ५ वर्ष प्रामाणिक प्रयत्न केले. कासार सिरसी अपर तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय, कासार सिरसी पाणीपुरवठा योजना, सरवडी - कोकाळगाव रस्ता, कासार सिरसी - कोराळी वाडी रस्ता सह अनेक अशक्य वाटणारे विषय मार्गी लावल्याचा दावा अभिमन्यू पवार यांनी केला आहे.
महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मागच्या 5 वर्षांमध्ये आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा लेखाजोगा तसेच आगामी 5 वर्षांमधील करावयाच्या कामांचे व्हिजन जनतेसमोर मांडले आहे. (BJP) मागच्या 5 वर्षांमध्ये केलेली विकासकामे, जनतेसाठी कायम राहिलेली उपलब्धता आणि सभागृहात 100% उपस्थित राहत जनहिताच्या विषयांची केलेली मांडणी यामुळे जनता पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने मला आशीर्वाद देईल, असा विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.