Phulambri APMC Election : बागडेंनी ठरवले अन् फुलंब्रीचे सभापती, उपसभापती बिनविरोध झाले..

Bjp : या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर हे गैरहजर राहिले.
Phulambri APMC Election, News
Phulambri APMC Election, NewsSarkarnama
Published on
Updated on

Haribhau Bagde News : फुलंब्री मतदारसंघात अजूनही आमदार हरिभाऊ बागडे यांचाच शब्द अंतिम असतो हे आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडणूकीवरून सिद्ध झाले आहे. (Phulambri APMC Election ) शिंदे गटालासोबत घेत निवडणूक लढल्यानंतर बागडे नानांच्या नेतृत्वाखाली पंधरा वर्षाची काॅंग्रसेची सत्ता घालवण्यात भाजप-शिंदे युतीला यश आले. १८ पैकी १४ संचालक निवडून आणत बहुमतासह सत्ता आल्यानंतर सभापती पदासाठी बागडे कुणाला पंसती देतात यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.

Phulambri APMC Election, News
Lasur Station APMC Election : बंब यांचे मिशन फत्ते ; सभापती, उपसभापती बिनविरोध..

परंतु (Bjp)भाजपच्या जिल्हा परिषदेतील माजी महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांच्या नावावर रविवारी झालेल्या बैठकीत बागडेंनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आज केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पाडली गेली. (Haribhau Bagde) बागडे व शिंदे गटाने एकमाताने ज्या नावांची निवड केली होती, त्यांच्या विरोधात एकही अर्ज आज आला नाही. त्यामुळे सभापतीपदी अनुराधा चव्हाण तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे दत्तात्रय करपे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर हे गैरहजर राहिले. (Marathwada) सभापती पदी अनुराधा चव्हाण व उपसभापतीपदी दत्तात्रय करपे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा आमदार हरिभाऊ बागडे व माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे, माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सत्कार केला. चव्हाण या बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या.

३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अकरा जागेवर दणदणीत विजय मिळविला होता, तर त्यांच्यासोबत असलेल्या शिंदे गटातील किशोर बलांडे गटाने तीन जागांवर यश मिळविल्याने १८ पैकी १४ जागा या भाजप आणि किशोर बलांडे गटाच्या ताब्यात आहेत. आज दुपारून तीन वाजत सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी बैठक पार पडली. सर्व संचालक बैठकीला हजर होते, परंतु बैठक सुरू होण्याआधीच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक वरुण पाथ्रीकर हे निघून गेले. निवडणूक निर्वाचन अधिकारी विष्णू रोडगे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com