Beed Crime News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या कटातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपावर मयत देशमुख यांचे कुटुंबिय ठाम आहे.
यासाठी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारात मागणार असून, याच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार करण्याची भूमिका देशमुख कुटुंबियांनी घेतली आहे.
संतोष देशमुख हत्येच्या कटातीली संशयित आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड (BEED) जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून केले जात आहेत. याच आरोपांबाबत देशमुख कुटुंब कारागृह प्रशासनाकडे तक्रार करणार आहे. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची मागणी केली जात आहे. देशमुख कुटुंबियांनी कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचार्यांची नावे घेत वाल्मिक कराड सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे.
या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार, असल्याचे देशमुख कुटुंबांकडून सांगण्यात आले. याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली आहोत, असेही म्हटले.
संतोष देशमुख हत्या, अवादा कंपनीकडे मागण्यात आलेली दोन कोटी रुपयांची खंडणी आणि संघटीत गुन्हेगारी प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात विशेष न्यायालयात 1400 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे दोषारोपपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष मकोका न्यायालयात दाखल केले आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणीत सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या सात जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. हत्येच्या कटात संशयित म्हणून वाल्मिक कराड याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील कृष्णा आंधळे हा गेल्या 80 दिवसांपासून फरारच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.