Beed : पंकजा मुंडेंना धक्का, पांगरी सोसायटीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात..

पंकजा मुंडे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है` च्या घोषणा देखील दिल्या जातात. पण त्यांची पाठ फिरताच सगळे बदलते हेच पांगरीतील निकालावरून स्पष्ट होते. (Beed News)
Dhnanjay Munde-Pankaja Munde, News Beed
Dhnanjay Munde-Pankaja Munde, News BeedSarkarnama

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील पांगरी सेवा सहकारी संस्था दहा वर्षानंतर राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. पंकजा यांचे बंधु व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था दहा वर्षांनी राष्ट्रवादीने जिंकली. सर्व जागा जिंकत राष्ट्रवादीने पंकजा मुंडे यांना धक्का दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Dhnanjay Munde-Pankaja Munde, News Beed
Shivsena : आदित्य ठाकरेंच्या सभेने सत्तारांना मिरची झोंबली..

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची या संस्थेवर निर्विवाद सत्ता होती. परंतु पंकजा मुंडे यांच्या परळीतील पराभवानंतर तालुक्यातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलत गेली. (Dhnanjay Munde) धनंजय मुंडे यांनी एकापाठोपाठ एक अशा स्थानिक संस्था ताब्यात घेत तिथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. (Pankaja Munde) त्यानंतर आता पांगरी सेवा सहकारी संस्था देखील त्यांनी ताब्यात घेत विधानसभा निवडणुकीनंतर सुरू असलेला विजयाचा सिलसिला सुरूच ठेवला आहे.

निवडणूक जरी सेवा सहकारी सोसायटीची असली तरी त्यातील पराभवाचे परिणाम मात्र येणाऱ्या विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये देखील दिसणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. ज्या पांगरीतच गोपीनाथ गड आहे, त्याच गावातील सोयायटी निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने पंकजा समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे.

पंकजा व धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय यांनी मतदारसंघावर मजबुत पकड मिळवली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्ष पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी मतदारसंघात विकासकामांसाठी मोठा निधी आणल्याचे बोलले जाते. मंत्रीपदामुळे मुंडे यांनी परळीच नाही तर बीड जिल्ह्यात आपली ताकद वाढवल्याचे दिसून येते.

त्यामुळेच एखाद्या विश्वासातील पदाधिकाऱ्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली तरी यश मिळते हेच पांगरी सोसायटी निवडणुकीतून दिसून आले आहे. पंकजा मुंडे मतदारसंघात आल्या की त्यांच्याभोवती गर्दी जमते. मेळावा, भाषणात `पंकजा मुंडे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है` च्या घोषणा देखील दिल्या जातात. पण त्यांची पाठ फिरताच सगळे बदलते हेच पांगरीतील निकालावरून स्पष्ट होते.

भगवान-भक्तीगडावर दसरा मेळाव्याला केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराजीचा विषय आता संपला, मला विधान परिषद नको काही नको, आता २०२४ च्या तयारीला लागा, असा संदेश त्यांनी समर्थकांना दिला होता. असे असतांना पांगरीत पराभवातून झालेली सुरूवात हे काही शुभ संकेत नाहीत. त्यामुळे पंकजा यांना परळीवर अधिक लक्ष द्यावे लागणार असेच दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com