Beed : पोलीस अधिकारी कुणाला विचारल्याशिवाय गुन्हा दाखल करायला का धजावत नाही?

बीडचा बिहार झाला असे तुमचे सहकारी आमदार विधानभवनात बोलत असताना तुम्ही कुठल्या ॲंटीचेंबरमध्ये लपला होतात ? (Beed District)
Guardian Minister Dhnanjay Munde
Guardian Minister Dhnanjay MundeSarkarnama

बीड : अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थितीत केले. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना अडचणीत आणणाऱ्या या मुद्यावरून आता जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून जिल्ह्याची बदनामी केली जात आहे, (Beed) असा आरोप करत पालकमंत्री धनंजय मुंडे यानी हात जोडतो, माझ्यावर वार करा, पण मायभूमीला बदनाम करू नका, असे आवाहन केले होते.

त्यानंतर आता पंकजा समर्थकांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकत धनंजय मुंडे यांना काही प्रश्न विचारले आहेत. गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी घटना घडल्या. गोळीबारापासून ते वाळू माफियांकडून बालकांना ट्रक खाली चिरडल्याचे गंभीर आरोप देखील झाले.

या पार्श्वभूमीवर विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, भाजपच्या नमिता मुदंडा या सर्वांनी पोलिस अधिक्षक आणि प्रशासनाला धारेवर धरत बीडचा बिहार झाल्याचा आरोप केला होता. यावर गृहमंत्र्यांनी पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवत पंधरा दिवसांत चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत त्या जिल्ह्याची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोशल मिडियावर पंकजा समर्थकांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री मुंडे यांना काही सवाल केले आहेत. यात प्रामुख्याने परळीमध्ये करूणा शर्मा (मुंडे) यांच्यावर झालेला हल्ला, पोलिसांकडून कारवाई, गुन्हे दाखल करण्यात होत असलेली टाळाटाळ, पालकमंत्र्यांकडून या सर्व विषयावर बाळगण्यात आलेले मौन यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तुम्ही म्हणालात ना जिल्हा बदनाम करु नका ,नावाने बोला..तर मग सांगा धनुभाऊ, परळीत पहिल्यांदा आलेल्या हिंदी भाषिक महिलेला तुमच्या कार्यकर्त्यांची जात कशी समजली ? इनोव्हाची डिकी ऊघडून आत गावठी कट्टा ठेवलेल्या व्हिडीओची तुमच्या एसपी राजा ने कुठली चौकशी केली ? पोलिस अधिकारी कुणाला विचारल्याशिवाय गुन्हाही नोंदवायला का धजावत नाहीत ?

Guardian Minister Dhnanjay Munde
Pritam Munde : बीडच्या सुरक्षा,भविष्याविषयी चिंता हा पंकजाताईंचा धर्मच

गेवराईत माफीयांच्या चुकीमुळे निष्पाप बालकांसह अधिकाऱ्यांचे जीव धोक्यात घालणाऱ्या वाळूमाफीयांचा धनी कोण? बीडचा बिहार झाला असे तुमचे सहकारी आमदार विधानभवनात बोलत असताना तुम्ही कुठल्या ॲंटीचेंबरमध्ये लपला होतात ? परळी मतदारसंघातील रस्त्यांची कामे नित्कृष्ट,अपुर्ण होत आहेत असे तुमचे सहकारी आमदार लक्षवेधी मांडतात तेंव्हा तुम्ही कुठे असता ?

शासकीय आरोग्य यंत्रणेकडून रॅमडेसवीर पळवून कुणाच्या कार्यालयातून काळा बाजार चालवला गेला ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे म्हणजे असं झालेय पक्षात विचारेना कुत्रं आणि ताईवर टिका करतंय भित्रं, असा टोला देखील पंकजा समर्थकांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com