अमित देशमुखांच्या आशीर्वादाने राज्याच्या सीमेवर सर्वात मोठा जुगाराचा अड्डा?
लातूर : जिल्हा (Latur) प्रशासनाकडून गैरव्यावहाराची माहिती दडवली जात आहे. त्याला पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचा आर्शिवाद आहे. त्यांच्याच आर्शिवादाने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमेवर सर्वात मोठा जुगाराचा अड्डा सुरु असल्याचा आरोप भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे.
भाजप नेते निलंगेकर यांनी काल याबाबत पालकमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, लातूर जिल्हा राज्याच्या सीमेवर आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही बेकायदेशीर कामे सुरु आहेत. त्यात तलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर सर्वात मोठा जुगाराचा अड्डा सुरु आहे. त्याला देखील पालकमंत्र्यांचाच आर्शिवाद आहे. त्यांच्या या आरोपाने खळबळ उडाली आहे.
श्री. निलंगेकर म्हणाले, राज्यभर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोनाची लाट आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. यासंदर्भात लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागाने उपचारांसाठी केलेल्या खरेदीत मोठा गैरव्यावहार झाला आहे. प्रशासनाने त्यात संधी म्हणून अनेक नियमांचा स्वहितासाठी उपयोग केला. त्याची माहिती मागितली असता, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चाही होऊ दिली जात नाही. त्याची माहिती मागविल्यानंतर अद्याप त्याबाबत माहिती दिलेली नाही. विचारणा केल्यावर वैद्यकीय विभागाकडून टाळाटाळ होत आहे.
या प्रकरणात प्रशासनाला पालकमंत्री देशमुख यांचा आर्शिवाद आहे. रुग्णांच्या उपचारासाठी कर्मचारी, डॅाक्टर्सना `पीपीई` किट देण्यात आले. `पीपीई` किट, रुग्णांना देण्यात येणारा आहार अशा विविध कामांमध्ये गैरव्यावहार झाला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किटची किंमत दोन हजार रुपये तर कोरोना रुग्णांच्या आहाराचा खर्च आठ कोटी दाखविण्यात आला. कोरोनाकाळातील अशा विविध उपाययोजना व उपचारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यावहार झाला आहे. त्याविषयी पाठपुरावा केल्यावर उडवा उडवी केली जात आहे.
...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.