मनसेला आमचा पाठिंबा, पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू, हुनमान चालीसाही म्हणू...

हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालीसा म्हणून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझीही हनुमान चालिसा मुखपाठ आहे. (Dr.Bhagwat Karad)
Dr. Bhagwat Karad-Raj Thackeray
Dr. Bhagwat Karad-Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेची आणि आमची हिंदुत्वाची भूमिका एकच होती म्हणूनच आम्ही कित्येक वर्ष एकत्र होतो. पण आता शिवसेना महाविकास आघाडी सोबत गेली आहे. (Bjp) हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत असल्याने मनसेने मशिदीवरील भोंगा आणि हिंदुत्वाची मुद्दा हाती घेतला आहे. (Raj Thackeray) भाजपही सुरवातीपासून हिंदुत्वाचा पुरस्कार करते. जे पक्ष हिंदुत्वाची भूमिका माडतात त्यांच्यासाठी आमची भूमिका पूरक असणार आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी स्पष्ट केले.

भाजप नेत्यांकडून मनसेचे समर्थन आणि जवळीक पाहता भविष्यात तुमची मनसेशी युती होणार का? यावर युती संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. (Marathwada) राज ठाकरे यांची औंरगाबादेत काल जाहीर सभा झाल्यानंतर कराड आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी शिवसेनेकडून होणारी टीका, मनसे सोबत युतीची शक्यता यावर आपली भूमिका मांडली. डाॅ. कराड म्हणाले, मनसेची भुमिका ही हिंदुत्वाची आहे. या संदर्भात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची भुमिका त्यांच्याशी पुरक आहे. राजकीय भुमिके संदर्भात प्रदेश पातळीवरील नेते निर्णय घेतील. मात्र हिंदुत्वावरून आमचा त्यांना पाठिंबा आहे. यामुळे भोंगे उतरविण्यासाठी पक्षाने सांगितल्यास भाजप कार्यकर्ते भोगे उतरवतील, भोंगे उतरवण्यापेक्षा आम्ही हनुमान चालीसा म्हणू शकतो.

हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालीसा म्हणून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझीही हनुमान चालिसा मुखपाठ आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे राज ठाकरे शहरात आले होते तेव्हा मी शहराध्यक्षांसह इतरांशी चर्चा केली. त्यानंतर संजय केणेकर यांच्यासह माझा मुलगा यांनी राज ठाकरे यांना मुलाच्या लग्ना निमित्त आयोजित स्वागत समारोहाचे निमंत्रण दिले.

Dr. Bhagwat Karad-Raj Thackeray
Shivsena : लाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो..

ते रिशेप्शनसाठी आले, या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुभाष देसाई,आरोग्यमंत्री राजेश टोपे, अमित देशमुख यांच्यासह चार ते पाच पक्षातील नेते आले होते. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांच्याशी कानगोष्टी करण्यास वेळच मिळाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या कराडांना दिल्लीतले काय कळते? याकडे कराडांचे लक्ष वेधले असता त्यांनी आपण खासदार व केंद्रात मंत्री झाल्यापासून ३० ते ३५ कोटींचा निधी आणल्याचा दावा करत खैरेंनी मात्र फक्त पत्र व्यवहाराच केल्याचा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com