Congress : शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी काॅंग्रेस न्यायालयीन लढाईच्या तयारीत ..

Crop Insurance : औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
Aurangabad District Congress News
Aurangabad District Congress NewsSarkarnama

Crop Insurance News : अतिवृष्टी, सतत आणि परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संकटाच्यावेळी मदत, नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी Farmers पीक विमा काढतात. पण प्रत्यक्षात जेव्हा भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा मात्र विमा कंपन्या हात वर करतात. Aurangabad राज्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती बघायला मिळते आहे.

Aurangabad District Congress News
Aurangabad : कराड, सावेंकडून पंतप्रधान अवास योजनेला गती देण्यासाठी फडणवीसांना साकडे

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तीनही पक्ष या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहेत. (Crop Insurance) शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. तर (Congress) काॅंग्रेसने शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी न्यायलयीन लढा देण्याची तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या सुचनेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील गांधी भवनात हे केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्धाटन आज जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. प्रत्यक्षात फक्त ६५ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. पीक विमा कंपन्यांकडून जाचक अटी टाकल्या जात असल्याने शेतकरी भरडला जात आहे. अशावेळी त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काॅंग्रेस देखील सरसावली आहे. साडेसात लाख शेतकऱ्यापैकी फक्त ६५ हजार शेतकरी पात्र ठरले असले तरी अद्याप कुणालाच नुकसान भरपाई मिळालेली नाही.

शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी काॅँग्रेसने मदत केंद्र सुरू केले असून या ठिकाणी जमा होणारे शेतकऱ्यांचे अर्ज हे थेट प्रदेश कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात काॅंग्रेस या संदर्भात आवाज उठवून पीक विमा कंपन्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास सरकारला भाग पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.

यानंतरही पदरी निराशा पडली तर शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काॅंग्रेस न्यायालयात जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. काॅंग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून अनेकजण अर्ज भरून देण्यासाठी येत असल्याचे पक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com