Rahul Gandhi Stay In Aurangabad News
Rahul Gandhi Stay In Aurangabad NewsSarkarnama

Congress : अडीच तास थंडीत कुडकुडणाऱ्या कार्यकर्त्यांना हात दाखवून राहुल गांधी निघून गेले...

थंडीच्या कडाक्यात अडीच ते तीन तास कार्यकर्ते रस्त्यावर उभे होते पण राहुल गांधी यांचा सत्कार करता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. (Rahul Gandhi)

औरंगाबाद : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी येथे सोमवारी (ता. २१) सायंकाळी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. तब्बल अडीच तास थंडीत कुडकुडत नेत्याची वाट पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना राहुल गांधी फक्त वाहनातूनच हात दाखवत निघून गेले. त्यामुळे सुमारे ताटकळेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Rahul Gandhi Stay In Aurangabad News
Aurangabad : चौथ्या दिवशी पाणीपुरवठा का नाही ? खंडपीठाकडून खरडपट्टी..

दरम्यान चिकलठाणा विमानतळावर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत केले. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. (Congress) मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. सोमवारी (ता. २१) दुपारी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे जळगाव जामोद येथून हेलिकॉप्टरने चिकलठाणा औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले. जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

विमानतळावरूनच गांधी सुरतला रवाना झाले. त्यानंतर सूरत व राजकोट येथील सभा आटोपून रात्री ७.३० वाजता पुन्हा त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. राहुल गांधी सोमवारी औरंगाबाद शहरात हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्कामी आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते.

जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ लिडर, डॉ. पवन भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक बाळूलाल गुजर, ॲड. सरोज मसलगे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मुकुंदवाडी येथे जमा झाले होते. ७.४५ वाजता राहुल गांधी यांचे मुकुंदवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यानी हार, पुष्पगुच्छ आणले होते. पण सुरक्षेच्या कारणावरून राहुल गांधी थांबलेच नाहीत. वाहनातूनच त्यांनी हात दाखवत कार्यकर्त्यांना अभिवादन केले.

पण वाहनाची गती एवढी होती की, अनेकांना राहुल गांधी दिसलेही नाहीत. थंडीच्या कडाक्यात अडीच ते तीन तास कार्यकर्ते रस्त्यावर उभे होते पण राहुल गांधी यांचा सत्कार करता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. याठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १०० जणांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पण गांधी न थांबल्याने बंदोबस्तावरील पोलिसांना हायसे वाटले. राहुल गांधी थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये रविवारपासूनच मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

रात्री आठ वाजता राहुल यांचे आगमन झाले. सकाळी मंगळवारी (ता. २२) ७.३० वाजता ते चिकलठाणा विमानतळावरून जळगाव जामोद येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान हॉटेलमध्ये फक्त दहा पदाधिकाऱ्यांसाठीच पासेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com