Vashi Market Committee
Vashi Market CommitteeSarkarnama

Dharashiv News : वाशी बाजार समितीत 24 लाखांचा गैरव्यवहार, माजी सभापतीसह संचालकांवर गुन्हा दाखल

Dharashiv News Vashi Market Committee : धाराशिवच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा घोटाळा झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या बाजार समितीत जवळपास 24 लाख रुपयांचा अपहार झाल्याची बातमी समोर आली आहे.
Published on

Dharashiv News, 29 August : धाराशिवच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत (Vashi Market Committee) मोठा घोटाळा झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या बाजार समितीत जवळपास 24 लाख रुपयांचा अपहार झाल्याची बातमी समोर आली आहे.

या प्रकरणी तत्कालीन सभापती प्रशांत चेडे (Prashant Chede) यांच्यासह संचालकांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 या कालावधीत वाशी बाजार समितीत संचालक मंडळाची कसलीही मंजुरी न घेता 24 लाख 70 हजार रुपये नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आले होते.

Vashi Market Committee
J.P. Gavit On CM Shinde : माजी आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंनाच उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात; प्रकरण चिघळणार?

या संदर्भात लेखापरीक्षा केशव बोंदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसात (Police) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सध्या परंडा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करीत असणारे प्रशांत चेडे यांची मात्र यामुळे चांगली गोची झाली आहे.

Vashi Market Committee
Beed News: जनसन्मान यात्रा येण्यापूर्वीच झळकले काळ्या रंगाचे बॅनर; बीडकरांनी विचारला अजितदादांना जाब

कारण ऐन निवडणुकीच्या (Election) तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून या प्रकरणाचा फटका त्यांना पुढील राजकीय वाटचालीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com