Sanjay Shirsat : सत्तारांचे मंत्रीपद राहिले काय ? अन् गेले काय ? माझा त्याच्याशी संबंध नाही..

Aurangabad Political : कृषीमंत्र्यांच्या मागे खूप व्याप असतो, त्यामुळे ते कदाचित निमंत्रण द्यायला विसरले असतील?
Sanjay Shirsat-Abdul Sattar News, Aurangabad
Sanjay Shirsat-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada News : अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद राहिले काय? अन् गेले काय? माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तसा अधिकार देखील मला नाही, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कशाला बोलू. माझ्या सत्तारांबद्दल काही रोष, नाराजी असण्याचे कारण नाही. (Abdul Sattar) सत्तारांनी देखील शिरसाट माझे चांगले मित्र आहेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विषयावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वाद आणि आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News, Aurangabad
Bjp News : फ्लाॅप सभेमुळे भाजप नेत्यांची झोप उडाली ; उद्धवसेनेनेही डिवचले..

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील राज्यस्तरीय महोत्सवाच्या उद्घाटनाला संजय शिरसाट (Sanjay Shirsat) गैरहजर असल्याच्या मुद्यावरून टीका केली होती. तसेच आपले मंत्रीपद गेले तर कुणाला तरी ते मिळेल म्हणून मंत्रीपदासाठी इच्छूक असलेला आमच्या पक्षातील नेता मुख्यमंत्र्यांचे कान भरत असल्याचा आरोप केला होता. (Marathwada) तो नेता संजय शिरसाट आहे का? असा प्रश्न विचारला.

तेव्हा मी संजय शिरसाट यांचे नाव घेतले नाही, पण तुम्हाला ते लक्षात आले असेल असे म्हणत सत्तारांनी शिरसाटांवर निशाणा साधला होता. त्यामुळे राज्यात शिंदे मुख्यमंत्री होवून त्यांच्या गटाचे सरकार सत्तेत असले तरी या पक्षात धुसफूस असल्याची चर्चा सुरू झाली होती. सत्तारांच्या आरोपानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील शिंदे गटावर तोंडसुख घेतले होते. या पार्श्वभूमीवर `सरकारनामा`ने संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला.

यावर शिरसाटांनी मोजक्या शब्दात भाष्य केले. शिरसाट म्हणाले, अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे मला त्रास होण्याचा काय संबंध. ते मंत्री राहिले काय? किंवा त्यांचे मंत्रीपद गेले काय? माझा त्याच्याशी संबंधही नाही आणि मला तसा अधिकार देखील नाही. त्यामुळे मला नाही वाटत सत्तार मला उद्देशून बोलले असतील. तसे त्यांनी स्पष्ट देखील केले आहे.

राहिला प्रश्न सिल्लोड येथील कृषी महोत्सवाला हजर न राहण्याचा, तर मला निमंत्रणच नव्हते तर मी कसा जाणार? याबद्दल मी त्यांना दोषही देत नाही, कृषीमंत्र्यांच्या मागे खूप व्याप असतो, त्यामुळे ते कदाचित निमंत्रण द्यायला विसरले असतील? असा खोचक टोला देखील शिरसाट यांनी लगावला. दरम्यान, सत्तार यांनी केलेल्या टीका आणि आरोपांना उत्तर देवू नका, शांत राहा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांना केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com