अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या किर्तनकारावर गुन्हा दाखल करा ; गृहमंत्र्यांना पत्र

देसाई यांनी पाटील यांना मेल केलेल्या तक्रारीत बाळकृष्ण महाराज मोगल याने सदर किर्तनकार महिले सोबतचा व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मिडियावर शेअर केल्याचे म्हटले आहे. (Trupti Desai)
Trupti Desai-Dilip Walse Patil
Trupti Desai-Dilip Walse PatilSarkarnama

औरंगाबाद : किर्तनकार बाळकृष्ण मोगल आणि सिल्लोड तालुक्यातील महिला किर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ बदनामीच्या हेतूने संबंधित बाळकृष्ण मोगल यानेच व्हायरल केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Social Media) यांनी केला. या संदर्भात किर्तनकार बाळकृष्ण मोगल याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Marathwada) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तनकार बाळकृष्ण मोगल यांचा व एका किर्तनकारच असलेल्या महिलेचा अश्लील व्हिडिओ कालपासून समाज माध्यमांवर व्हायरल झाला. (Aunragabad) या घटनेबद्दल वारकरी सांप्रदाय व किर्तनकार मंडळींमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच सदर महिलेने बदनामीच्या भितीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे देखील बोलले जाते.

या प्रकरणात तृप्ती देसाई यांनी किर्तनकार बाळकृष्ण मोगल यानेच संबंधित महिलेच्या बदनामीच्या हेतूने संभोग करतांनाच व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा देसाई यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. एवढ्यावरच न थांबता देसाई यांनी या प्रकरणात बाळकृष्ण मोगल याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Trupti Desai-Dilip Walse Patil
Beed : आमदार सुरेश धस यांना खंडपीठाचा दणका ; दरोड्याच्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ..

देसाई यांनी पाटील यांना मेल केलेल्या तक्रारीत बाळकृष्ण महाराज मोगल याने सदर किर्तनकार महिले सोबतचा व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मिडियावर शेअर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मोगल यांच्यावर सायबर क्राईम कायद्यान्वये कलम ६६ अ आणि ६७ अ तसेच आयपीसी २९२ अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com