पन्नास कोटी द्या, घरदार सगंळ तुमच्या नावावर करतो; धस यांचे विरोधकांनाच आव्हान

राम खाडे,अॅड. असीम सरोदे यांनी औरंगाबादेत आष्टी तालुक्यातील देवस्थान, इनामी जमीनी मधील २०० हेक्टर जमीन बनावट दस्तऐवज करून बळकावल्याचा आरोप केला होता. (Mla Suresh Dhas)
Mla Suresh Dhas

Mla Suresh Dhas

Sarkarnama

बीड ः भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थानची जमीन हडप करून एक हजार कोटी रुपयांचा घोटाळ्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर धस यांनी आतापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया न देता मौन बाळगले होते. (Bjp) अखेर आज आपल्यावरील आरोपांना धस यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांनाच आव्हान दिले आहे. (Beed) मला पन्नास कोटी रुपये द्या, माझ्या नावावरचे घरदार संगळ तुमच्या नावावर करून जिल्हा सोडतो, असे आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले आहे.

तुमचं सरकार आहे चौकशी करा, ढगात गोळ्या मारू नका, असा टोलाही धस यांनी लगावला. १ हजार कोटींच्या देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर, भाजप आमदार सुरेश धस यांनी अखेर मौन सोडत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.

तुमचं सरकार आहे चौकशी करा, ढगात गोळ्या मारू नका. १ हजार कोटीचा आरोप करणाऱ्यांना, माझ्याकडील माझ्या वडलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी, मी त्यांच्या नावावर करतो. मला फक्त ५० कोटी द्या, मी घरदार सगळं सोडून जिल्हाही सोडतो, असे खुले आव्हानच सुरेश धस यांनी आरोप करणाऱ्यांना दिले आहे. खोटे आरोप करून बदनाम करु नका, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

पाटोदा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादीचे माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन, आष्टी तालुक्यातील देवस्थान आणि इनामी जमीनी मधील २०० हेक्टर जमीन बनावट दस्तऐवज करून बळकावल्याचा आरोप केला होता.

<div class="paragraphs"><p>Mla Suresh Dhas</p></div>
सगळं माझ्याच गल्ल्यात; असे पालकमंत्री अन् आमदारांचे काम

एक हजार कोटींच्या जमिनीचा हा घोटाळा आमदार सुरेश धस यांनी केल्याचे आरोपात म्हटले होते. तशी तकारच राम खाडे यांनी ईडीच्या कार्यालयात दिली आहे. यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सुरेश धस आपल्यावरील आरोपांना कसे प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण धस यांनी यावर मौन बाळगणेच पंसत केले होते.

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात त्यांनी अखेर मौन सोडले आणि आरोपांना उत्तर दिले. आमदार सुरेश धस यांनी तक्रारदाराला आव्हान देत म्हणाले, ईडीकडे तक्रार केली, त्याना माझं म्हणणं आहे, की माझ्याकडे १ हजार कोटीची जमीन संपत्ती आहे. त्याना माझं चॅलेंज आहे फक्त ५० कोटी द्या, मी माझी वडिलोपार्जित सगळी प्रॉपर्टी घरदार तुमच्या नावावर करून जिल्हा सोडून जातो. त्यामुळं आता हे प्रकरण काय वळण घेणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com