Nagpur : राज्यपाल पुन्हा वादात, दिवंगत नरसिंहराव यांच्या पुतळ्याच्या अनावरणास नकार..

Ashok Chavan : राज्यपाल येण्याच्या अवघ्या एक दिवस आधी २० डिसेंबर रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे.
Ashok Chavan-Governor News, Nagpur
Ashok Chavan-Governor News, NagpurSarkarnama

Winter Session News : राज्यपाल आणि वाद काही थांबायला तयार नाहीत. महापुरुषांच्या अपमानावरून कोश्यारी यांच्याविरोधातील वातावरण तापलेले असतांनाच आता आणखी एक नवा वाद त्यांनी ओढावून घेतला आहे. Congress देशाची माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारल्या आरोप केला जातोय.

Ashok Chavan-Governor News, Nagpur
Ashok Chavan : बोम्मईंच्या ट्विट प्रकरणी सरकारने बोटचेपी, नरमाईची भूमिका का घेतली ?..

काॅंग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलतांना यावर भाष्य केले. (Ashok Chavan) अशोक चव्हाण म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था नाजूक असताना नरसिंहराव यांच्या काळात अनेक महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) केले असते तर ते अधिक योग्य ठरले असते.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते असले तरी ते देशाचे पंतप्रधान होते. देशातील एक उत्तुंग व विद्वान नेते म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदारही राहिले होते. २१ डिसेंबर रोजी कुलपती या नात्याने दीक्षांत समारोहासाठी राज्यपाल विद्यापिठात येत असतांना देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण आदल्या दिवशीच उरकून घेण्यामागे नेमके प्रयोजन तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

एवढेच नव्हे तर राज्यपाल येण्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करून घ्या, असेही राज्यपाल कार्यालयाने कळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यापिठाने राज्यपाल येण्याच्या अवघ्या एक दिवस आधी २० डिसेंबर रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी या विद्यापिठाचा दीक्षांत समारोह नियोजित आहे.

याच वेळी नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती. मात्र, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसल्याची माहिती आहे. नरसिंहराव हे कवेळ काॅंग्रेसचे होते म्हणून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास कोश्यारी यांनी नकार दिल्याच्या आरोपानंतर आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com