Hingoli Assembly Constituency : पेनगंगा नदीवरील बॅरेजेससाठी आठशे कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी

पेनगंगा नदीवरील ११ बँरेजेससाठी ७८७.१४ कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी मिळाली आहे. हिंगोलीत मेडीकल काँलेजला मंजुरी मिळाली असुन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली
Hingoli Assembly Constituency : पेनगंगा नदीवरील बॅरेजेससाठी आठशे कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी
Published on
Updated on

हिंगोली : हिंगोली विधानसभेतील पेनगंगा नदीवरील ११ बँरेजेससाठी ७८७.१४ कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरीसह हिंगोली शहरातील पाणीपुरवठ्यासाठी ८४.५० कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती महायुतीत भाजपाचे हिंगोली विधानसभेचे उमेदवार आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुर्गादास साकळे, उमेश नागरे, मिलिंद यंबल आदीची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभा मतदार संघातील संकल्प पत्रा संदर्भात विकास कामाची माहिती दिली. हिंगोली शहरात नगरोत्थान महाअभियानातंर्गत शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास ८४.५० कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे सांगितले.

तसेच पेनगंगा नदीवरील ११ बँरेजेससाठी ७८७.१४ कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी मिळाली आहे. हिंगोलीत मेडीकल काँलेजला मंजुरी मिळाली असुन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. पुढील काळात कयाधू नदीवरील उर्वरित बंधारे, बासंबा बायपास उड्डाणपूल, रिसाला बाजार उड्डाण पुल, सिरहेकशहा बाबा दर्गा तलाव परिसराचे सुशोभिकरण, इंदिराखुले नाट्यगृह व खुराणा पेट्रोल पंपासमोरील नगर परिषद वातानुकुलीत संकुल, कयाधू नदीवरील उड्डाणपूल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना, येलदरी धरण डावा कालवा, शेतीकडे जाणारे पांदण रस्ते,

गाव तेथे व्यायाम शाळा, क्रीडांगण, स्मशानभूमी हि कामे प्रस्तावित असल्याचे आमदार मुटकुळे यांनी सांगितले. दरम्यान यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी भाजपच्या संकल्प पत्रासंदर्भात माहिती देताना सांगितले कि, लाडक्या बहिणींना यापुढे दरमहा २१०० रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ १२ ऐवजी १५ हजार मिळणार आहेत एमएसपी वर २० टक्के अनुदान देणार आहेत.

प्रत्येक गरीबाचा स्वप्न पुर्ण होईल भाजप महायुती अन्नसुरक्षा योजना आणि हक्काचे घर, वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला २१०० रुपये दिले जाणार, ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांदण रस्ते, वीज बिलात ३० टक्के कपात आदी विषयी माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com