Imtiaz Jaleel : नवाबभाई आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील त्याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. (Mp Imtiaz Jaleel)
Mp Imtiaz Jaleel, Aurangabad
Mp Imtiaz Jaleel, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी दाऊद इब्राहीम याच्या मनी लाॅन्ड्रींग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. (Aimim) या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याने नाव दाऊदशी जोडले जाते, अशा आरोप केला होता. (Mp Imtiaz Jaleel) त्यानंतर ईडीच्या कारवाई विरोधात महाविका आघाडीने राज्यभरात आंदोलन केले. आता या वादात एमआयएमने देखील उडी घेतली आहे.

मुस्लिमांना दहशतवादी म्हणून त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जाते, असा आरोप करत नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर उतरण्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली. औरंगाबादेत बोलतांना इम्तियाज यांनी ही भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगले ढवळून निघाले आहे. ईडीच्या कारवाईनंतरही मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय घेत महाविकास आघाडीने भाजपच्या दबावासमोर न झुकण्याची भूमिका घेतली आहे. या सगळ्या वादावर आज एमआयएमने पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, मुस्लिम समाजाला नेहमी दहशतावादाशी जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून हे प्रकार वाढले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील त्याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. परंतु ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दहशतवादाशी जोडला जात असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

Mp Imtiaz Jaleel, Aurangabad
सत्तेत असून न्याय मिळत नाही, पण भाजपला खाली खेचायचेय म्हणून समजून घ्यावे लागते..

मलिक यांचे दहशतवादाशी संबंध होते, पुरावे होते म्हणता, तर मग इतकी वर्ष काय केले? कारवाई का केली नाही? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला. मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी या समाजाचा दहशतवादाशी संबंध जोडून त्यांच्यावर चुकीच्या कारवाया करणे यापुढे खपवून घेणार नाही. मलिक यांच्यासाठी आम्ही निश्चितच रस्त्यावर उतरू, असा इशाराही इम्तियाज यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com