औरंगाबादेत धर्मांतर करून हिंदू झालेले कधी ख्रिश्चन नव्हतेच; महासंघाचा दावा

पैठण येथील नाथमंदिरात शनिवारी १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करत हिंदुधर्म स्विकारला. (Conversion)
Conversion In Aurangabad

Conversion In Aurangabad

Sarkarnama

Published on: 
Updated on: 

औरंगाबाद ः पैठणच्या नाथ मंदिरात मंठा तालुक्यातील १२ कुटुंबातील ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केला होता. (Aurangabad) आज दोन दिवसानंतर या प्रकाराबद्दल ख्रिश्चन महासंघाने दावा करत धर्मांतर (Conversion) करण्यात आलेले लोक ख्रिश्चन नव्हतेच असे म्हटले आहे. (Marathwada)

ख्रिश्चन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांनी असा दावा केला असून जे ख्रिश्चन म्हणून पुन्हा हिंदू धर्मात गेल्याचा दावा करत आहेत, त्यांच्याकडे बाप्तीस्मा केल्याचे प्रमाणपत्र आहे का? असा सवाल देखील संबंधितांनी केला आहे.

पैठण येथील नाथमंदिरात शनिवारी १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करत हिंदुधर्म स्विकारला. नाथवंशजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. मात्र दोन दिवसातच हा सोहळा वादात सापडला आहे. मुळात ते ख्रिश्चन नव्हतेच असा दावा ख्रिश्चन महासंघाने केला आहे.

महाराष्ट्रात ख्रिश्चनांच्या विरोधात वातवरण तयार करण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना असे प्रकार करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. ज्यांनी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे, त्याच्या जातीचे प्रमाणपत्र तापसले पाहिजे.

<div class="paragraphs"><p>Conversion In Aurangabad</p></div>
शिवसेनेने रुईकर कुटुंबाची जबादारी घेताच पाच लाखांची मदत पोहचली

राज्यात व देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतांना कुठल्या तरी धर्माला लक्ष्य करणे योग्य नाही. दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, मुळात दोन दिवसांपुर्वीच नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com