Latur BJP : आता विधानसभा जिंकणार; भाजपची रणनीती ठरली...

Sudhakar Shrangare And BJP : लोकसभेच्या पराभवाबद्दल चिंता अन् चुका दुरुस्त करून विधानसभा लढण्याचा निश्चय
Latur BJP
Latur BJPSarkarnama

Latur Political News : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा नक्कीच चिंताजनक आहे. या निवडणुकीत झालेल्या सर्व चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुक ताकदीने लढण्याचा निश्चय लातूर भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन व आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षक विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये शुक्रवारी बैठक पार पडली.

लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोर कमिटी सदस्यांशी संवाद साधून लोकसभेबद्दलचा आढावा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती कशी असावी, या संदर्भात त्यांनी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या सर्व चुका दुरुस्त करून विधानसभा निवडणुकीत एकदिलाने प्रयत्न करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा प्रभारी किरण पाटील, माजी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूरमधून भाजपचा दारुण पराभव झाला. पक्षाने सुधाकर शृंगारे Sudhakar Shrangare यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लातूरमध्ये झाली होती. एवढे करूनही काँग्रेस महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे या नवख्या उमेदवाराने सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला.

Latur BJP
Salman Khan : चित्रीकरणासाठी सलमान खान महाबळेश्वरात; मुक्काम मात्र ईडीने जप्त केलेल्या वाधवानच्या बंगल्यात...

या पराभवाने भाजपची हॅट्रीक हुकली, तर काँग्रेसने भाजपकडून लातूर लोकसभेची जागा खेचून जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे लातूरमध्ये पक्षाचा उमेदवार पडला, अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण बैठकीत गटबाजीवर चर्चा न करता विधानसभा निवडणुकीआधी लोकसभेला झालेल्या चुका दुरूस्त करून ताकदीने लढण्याचा निर्धार करत वेळ मारून नेण्यात आली.

मराठा आरक्षण, भाजप संविधान बदलणार या महाविकास आघाडीने केलेल्या प्रचाराला आम्ही रोखू शकलो नाही, अशी स्पष्ट कबुली संभाजी पाटील निलंगेकर यांनी याआधीच दिली होती. आता पक्ष निरीक्षकांसमोर विधानसभा ताकदीने लढवण्याचा शब्द लातूर जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

आता खरचं लोकसभेला झालेल्या चुका हे नेते सुधारतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत विजयाने आत्मविश्वास बळावलेल्या काँग्रेसनेही विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सगळ्या जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत तयारी सुरू केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Latur BJP
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : तुमच्याकडं ना आमदार ना खासदार, पाठिंब्याचा...; अमित ठाकरेंना 'या' नेत्यानं सुनावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com